4 May 2025 1:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Adipurush Movie | स्टेजवर प्रभास कपाळावरचा घाम पुसताना दिसला, क्रिती सेनॉनने घाम पुसायला थेट दुपट्टा ऑफर केला, व्हिडिओ व्हायरल

Adipurush

Adipurush Movie | मैत्री कोणत्या रुपामध्ये दिसून येईल ते सांगता येत नाही. सर्वांत पवित्र नातं मैत्री आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. दरम्यान, ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर रविवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये प्रभाससोबत क्रिती सेनॉन मुख्य भुमिकेमध्ये दिसून येणार आहे. हे दोन दिग्गज कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत तर या चित्रपटात प्रभासने प्रभु श्री रामा यांची भूमिका साकारली आहे तर क्रिती सेनॉनने सीता मैय्याची भूमिका साकारली आहे. ‘आदिपुरुष’चा टीझर खूप धमाल करत आहे, पण प्रभास आणि क्रितीची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे हे देखील तितकेच खरे आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या या धार्मिक शहरात चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे तर. टीझर रिलीज दरम्यान प्रभास आणि क्रितीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

प्रभास आणि क्रितीची क्यूट केमिस्ट्री आली समोर
नुकताच ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे टीझर रिलीज झाला आहे. दरम्यान, सर्व कलाकार चित्रपटाच्या प्रमोशन साठी सर्वत्र फिरत आहेत. तर यावेळी कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या थाटात करण्यात आले होते. व्हिडिओमध्ये प्रभास, कृती, चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आणि निर्माता भूषण कुमार स्टेजवर दिसून येत आहेत, या दरम्यान प्रभासला गरम होत होते, प्रभास कपाळावरचा घाम पुसताना दिसला मग क्रिती त्याला आपला दुपट्टा ऑफर करते आणि प्रभासकडे बघून हसते. इव्हेंटमध्ये क्रितीने क्रीम कलरचा ग्लिटरी आउटफिट घातला होता तर प्रभासने कुर्ता पायजमा घातला होता.

टीझर ट्रोल होत आहे
‘आदिपुरुष’ 12 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे तर प्रभास आणि क्रिती व्यतिरिक्त या चित्रपटात सैफ अली खान रावनाच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. चित्रपटाचे बजेट 500 कोटी असल्याचे समोर येत आहे. प्रचंड बजेट असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरला चांगला प्रतिसाद मिळालेला नाहीये. ‘बाहुबली’पासून प्रभासचा प्रत्येक चित्रपट आतुरतेने फॉलो केला जातो पण ‘आदिपुरुष’च्या टीझरने चाहत्यांची घोर निराशा केली असल्याचे दिसून येत आहे. चाहते कार्टून चित्रपटांप्रमाणे टीझरचे व्हीएफएक्स सांगत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Adipurush Movie Kriti Sanon And Prabhas video trending on social media checks details 4 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Kriti Sanon And Prabhas(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या