4 May 2025 2:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
x

कठीण काळात काँगेसचीही उद्धव ठाकरेंना साथ, मुंबई अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक उमेदवार न देता समर्थन देणार

Uddhav Thakceray

Andheri East By Poll Election | गर्दी जमवून लोक आपल्याच बाजूनं आहेत, असं सांगण्यात ठाकरे-शिंदेंमध्ये चढाओढ लागलीये. दसरा मेळाव्यावरून तर दोघांमध्ये गर्दीची स्पर्धाच रंगलीये. पण दोघांच्या ताकदीची खरी टेस्ट होणाराय, ती अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत. शिवसेनेतल्या बंडाळीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. आणि ठाकरेंच्या बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या मुंबईत ही निवडणूक होतेय.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबरला मतदान, तर ७ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. १४ ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. शिवसेना आमदार रमेश लटकेंच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक होतेय. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ऋतुजा लटकेंना उमेदवारी जाहीर केलीय. दुसरीकडे भाजपकडून मुरजी पटेल यांचं नाव आघाडीवर आहे. शिंदे गटाने निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याचं म्हटलं जातंय.

मराठी माणसांएवढाच अमराठी टक्का निर्णायक :
अंधेरी पूर्व मतदारसंघ मुंबईच्या उपनगरात येतो. उपनगरात निवडणुकीच्या राजकारणात मराठी माणसांएवढाच अमराठी टक्का निर्णायक आहे. अंधेरीत सुमारे पावणे तीन लाख मतदार आहेत. यामध्ये सर्वाधिक १ लाख मतदार मराठी आहेत. त्यानंतर उत्तर भारतीय जवळपास ५५ हजार, मुस्लिम ३८ हजार, गुजराती/राजस्थानी ३५ हजार, दक्षिण भारतीय २० हजार आणि ख्रिश्चन १५ हजार आहेत.

दरम्यान, मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. आता काँग्रेसने सुद्धा शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला असून उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला आह, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या यांच्या आकस्मित निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे, अशी घोषणा नाना पटोले यांनी केली आहे

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mumbai Congress will contest Andheri Est By Poll Assembly Election announced by Nana Patole check details 05 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या