18 May 2024 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या
x

Numerology Horoscope | 06 ऑक्टोबर रोजी या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, दिवाळीत आला शुभं योग

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

अंक 1 :
गुरुवारी तुमचा दिवस सामान्य असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. आधीच सुरू असलेल्या समस्या सुटतील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अधिकाऱ्यांचा सहवास मिळणार. नव्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपविता येतील. परिवाराचे सहकार्य मिळेल. आपले आरोग्य सामान्य राहील.

अंक 2 :
गुरुवारी तुमचा दिवस संमिश्र जाईल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नव्या कल्पना मनात येतील. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळू शकतात. सकारात्मकता जपा. कुटुंबात काही समस्या उद्भवू शकतात. अनावश्यक खर्च वाढू शकतो. कुटुंबात वाद होऊ शकतात. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो.

अंक 3 :
गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. पूर्वकल्पित कामे पूर्ण होतील. कला आणि संगीतात तुमची रुची वाढेल. सर्जनशील कार्याकडे कल वाढेल. क्षेत्रात व व्यवसायात आधीपासून सुरू असलेल्या समस्या सुटतील. नशीब साथ देईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो.

अंक ४ :
गुरुवारी तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आपण व्यवसायाच्या सहलीवर जाण्याची योजना आखू शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक कार्यात आपली रुची वाढेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकेल. आपले आरोग्य सामान्य राहील.

अंक 5 :
गुरुवारी तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नोकरी-व्यवसायात सावधानता बाळगा. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. कोणत्याही कामात घाई करू नका. खर्चाचा अतिरेक होईल. व्यवसायात स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. घशाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.

अंक ६ :
गुरुवारी तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. मनात आनंदाची भावना राहील. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या सोपविता येतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबात कलह होऊ शकतो. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

अंक 7 :
गुरुवारी तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नोकरी-व्यवसायात अडचणी येऊ शकतात. काळजीपूर्वक वागा. निरर्थक वादांपासून दूर राहा. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. गुंतवणूक करायची असेल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. वाद-विवादांपासून दूर राहा. कुटुंबात वाद होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते.

अंक 8 :
गुरुवारी तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. क्षेत्र आणि व्यवसायात नशिबाची साथ कमी मिळेल. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊनच महत्त्वाच्या कामांमध्ये निर्णय घ्या. कामाच्या ठिकाणी एकाग्रता ठेवा. महत्त्वाची कामे लांबणीवर पडू शकतात. व्यावसायिक स्पर्धा परिस्थितीपासून दूर राहा. परिवाराचे सहकार्य मिळेल. सहलीला जाण्याचा बेत आखू शकता. आपले आरोग्य सामान्य राहील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.

अंक ९ :
गुरुवारीचा तुमचा दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. क्षेत्र आणि व्यवसायात नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. भावुकतेमुळे महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आपण व्यवसायाच्या सहलीवर जाण्याची योजना आखू शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 05 October 2022.

 

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(490)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x