6 May 2025 5:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS RVNL Share Price | झटपट मोठी कमाई होईल, पीएसयू शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL BHEL Share Price | या मल्टिबॅगर पीएसयू शेअरला तज्ज्ञांनी दिली BUY रेटिंग, मिळेल इतका मोठा परतावा - NSE: BHEL
x

Drishyam 2 Trailor Out | अजय देवगणच्या 'दृश्यम 2' चित्रपटाचा टीझर झाला आऊट, कहानी करेल रोमांचक

Drishyam 2 Trailer Out

Drishyam 2 Trailor Out | गेल्या काही दिवसांपासून जय देवगणच्या बहुप्रतिक्षित ‘दृश्यम 2’ चित्रपटाच्या टीझरची चाहत्यांना प्रतिक्षा होती, मात्र ही प्रतिक्षा संपली असून या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे, आणि चाहते आता चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. अजय देवगणच्या या चित्रपटाबाबत लोकांमध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे. तर अजय सतत चित्रपटाशी संबंधित पोस्ट करत असतो आणि या क्रमामध्ये, त्याने ‘दृश्यम 2’ चे नवीन पोस्टर सुद्धा शेअर आहे. यावेळी त्याने सांगितले की, चित्रपटाचा ट्रेलर 17 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. तसेच या चित्रपटाचा ट्रेलर गोव्यामध्ये लाँच करण्यात येणार आहे आणि यासाठी निर्मात्यांनी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजनही केले आहे.

दृश्यम 2′ चित्रपटाचा टीझर आऊट
अजय देवगणने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. तसेच शेअर केलेल्या पोस्टरमध्ये तब्बू आणि अक्षय खन्नाचा यामध्ये मिरर लुक दिसून येत आहे. तर अजय पोलिस स्टेशनच्या चौकशी कक्षात बसलेला आहे, तेव्हा अक्षय आणि तब्बू बाहेरून अजयकडे गंभीरपणे बघताना दिसत आहेत.

या दिवशी ‘दृश्यम 2’ चा ट्रेलर होणार लाँच
‘दृश्यम 2’ चित्रपटाचे पोस्टर शेअर करत अजय देवगणने लिहिले आहे की, “सत्य हे झाडाच्या बीसारखे असते आणि तुला पाहिजे ते पुरून टाकतो, ते एक दिवस बाहेर येईल. दृष्यम 2 चा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे म्हणजेच 18 नोव्हेंबर 2022 रोजी खटला पुन्हा सुरू होईल.” तब्बूनेही हेच पोस्टर शेअर करत टीझर असेच कॅप्शन दिले आहे.

गोव्यात ट्रेलर लॉन्च कार्यक्रम
‘दृश्यम 2’चा ट्रेलर लॉन्च करण्यासाठी निर्मात्यांनी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि हा कार्यक्रम गोव्यात पार पडला आहे. चित्रपटाची टीम यासाठी जोरदार तयारी करताना दिसली आहे. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अनेक चित्रपट समीक्षक आणि रसिक गोव्याला रवाना झाले आहेत आणि त्याच वेळी, चित्रपटाचे कलाकार गोव्यामध्ये ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाला देखील उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Drishyam 2 Trailer Out Checks details 18 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Drishyam 2 Trailor Out(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या