2 May 2025 11:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Vivo Y02 Smartphone | Vivo Y02 स्मार्टफोन लाँच, किंमत 8999 रुपये, जबरदस्त फीचर्स पहा

Vivo Y02 Smartphone

Vivo Y02 Smartphone | विवोने विवो Vivo Y02 हा नवा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. कंपनीच्या नव्या हँडसेटची किंमत 8999 रुपये आहे. फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी आहे. Vivo Y02 या कंपनीच्या या एन्ट्री-लेव्हल फोनला आकर्षक युनिबॉडी डिझाइन देण्यात आले आहे. फोनमध्ये मोठ्या आकाराचा डिस्प्ले आणि स्ट्राँग प्रोसेसर देण्यात आला आहे.

फीचर्स
विवोच्या नव्या फोनचा डिस्प्ले साइज ६.५१ इंच आहे. बजेट रेंज फोनमध्ये ७२० पिक्सल आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले वॉटरड्रॉप स्टाइल नॉच तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. फोनच्या डिस्प्लेमध्ये आय प्रोटेक्शन मोडचा सपोर्ट देण्यात आला आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी नव्या विवो वाय02 हँडसेटमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक प्रोसेसर देण्यात आला आहे. विवोच्या लेटेस्ट फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनची स्टोरेज क्षमता 1 टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

ऑपरेटिंग सिस्टिम आणि बॅटरी
विवोच्या या नव्या हँडसेटमध्ये फनटच ओएस १२ ऑपरेटिंग सिस्टिम आहे. फोन अँड्रॉयड १२ वर काम करतो. विवो वाय ०२ स्मार्टफोनमध्ये इलेक्ट्रॉनिक कंपास, फेस वेक, इझीशेअर आणि आयमॅनॅगर सारखे सेन्स फीचर्स देखील आहेत. हे सर्व फीचर या फोनला बाकीच्या बजेट रेंज फोनपेक्षा वेगळे करते. फोटोग्राफीच्या बाबतीत विवोच्या या नव्या हँडसेटमध्ये 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा मजेदार कॅमेरा आहे. फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी आहे. ज्यात चार्ज करण्यासाठी 10 वॉट मायक्रो-यूएसबी चार्जिंगचा सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, फोनमध्ये ड्युअल सिम आणि 4 जी कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट आहे.

कुठे मिळेल विवोचा नवा फोन
विवो वाय०२ फोनचे वजन १८६ ग्रॅम आहे. फोनची जाडी ८.४९ मिमी आहे. विवोच्या या फोनचं डिझाइन प्लास्टिकपासून तयार करण्यात आलं आहे. ऑर्किड ब्लू आणि कॉस्मिक ग्रे या दोन रंगात हा फोन उपलब्ध आहे. विवो वाय 02 स्मार्टफोन विवो इंडियाच्या सर्व ई-स्टोअर्सवर उपलब्ध आहे. तसेच, हा फोन विवो कंपनीच्या पार्टनर रिटेल स्टोअरमधून सहज उपलब्ध होणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Vivo Y02 Smartphone launched in India check price details on 06 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vivo Y02 Smartphone(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या