21 May 2024 1:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Lottery Share | चमत्कारी शेअर! अवघ्या 10000 रुपये गुंतवणुकीवर 1100 कोटी रुपये परतावा, आता 40% स्वस्त झालाय

Lottery Stock

Lottery Share | आपण अनेक लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक करून लक्षाधीश आणि अब्जाधीश होताना पाहिले असेल. ते लोक श्रीमंत होतात कारण त्यांना चांगल्या कंपनीचे शेअर्स ओळखता येतात. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉक बद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणुकदारांना अब्जाधीश बनवले आहेत. या कंपनीचे नाव आहे, Wipro. विप्रो कंपनीच्या सुरुवातीच्या काळात ज्या लोकांनी त्याचे 100 शेअर्स खरेदी केले होते, त्यात वाढ होऊन आता त्यांची संख्या 2 कोटी शेअर्सवर गेली आहे. हा चमत्कार घडला बोनस शेअर्समुळे. विप्रो कंपनीने सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना वेळोवेळी भरघोस बोनस शेअर्स वाटप केले आहेत. ज्या लोकांनी विप्रो कंपनीच्या सुरुवातीच्या काळात गुंतवणूक केली होती, त्यांना आतापर्यंत एकूण 14 वेळा बोनस शेअर्सचा फायदा झाला असता. चला तर मग जाणून घेऊ हे सामान्य गुंतवणुकदार अब्जाधीश कसे बनले. या शेअरची उच्चांकी पातळी 727 रुपये होती जो सध्या 395 रुपयांवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Wipro Share Price | Wipro Stock Price | BSE 507685 | NSE WIPRO)

विप्रो कंपनीच्या शेअरची कथा :
विप्रो ही भारतातील तसेच जगातील दिग्गज IT कंपन्यापैकी एक आहे. या कंपनीचे शेअर्स सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमवून देत आहेत. जर तुमच्या घरातील मोठया व्यक्तींनी 1980 साली विप्रो कंपनीमध्ये 10,000 रुपये गुंतवणूक करून काही शेअर्स खरेदी केले असते, तर आज तुम्ही तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तीच्या कृपेने अब्जाधीश असता. ज्या लोकांनी त्याकाळात विप्रो कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 1,100 कोटी रुपये झाले आहे. विप्रो कंपनीने नियमित आपल्या गुंतवणुकदारांना बोनस शेअर्स, लाभांश आणि स्टॉक स्प्लिट चा फायदा मिळवून दिला आहे. याचाच परिणाम आहे की हे लोक फक्त 10000 रुपये गुंतवून आज 1100 कोटींचे मालक बनले आहेत.

10000 वर 1100 कोटी परतावा कसा मिळाला? :
जर तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींनी 42 वर्षांपूर्वी म्हणजेच 1980 मध्ये 10,000 रुपये गुंतवून विप्रो कंपनीचे शेअर्स खरेदी केले असते तर त्यांना त्यावेळी फक्त 100 विप्रो शेअर्स मिळाले असते. बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट आणि इतर ऑफरसह हे 100 शेअर्स आज वाढून 2 कोटींहून अधिक शेअर्समध्ये रुपांतरीत झाले आहेत. त्याच वेळी सध्याच्या बाजार भावानुसार या शेअर्सचे मूल्य सध्या 1100 कोटी रुपये आहे. हे सर्व कसे घडले ते जाणून घेऊया.

विप्रोचा बोनस आणि शेअर स्प्लिटचा इतिहास : -1980 मध्ये 10000 गुंतवणुकीवर 100 शेअर्स मिळाले. -1981 मध्ये 1:1 बोनससह 200 शेअर्स
* 1985 मध्ये 1:1 बोनससह 400 शेअर्स
* 1986 मध्ये 1:10 बोनस शेअर्स प्रमाणे 4000 शेअर्स आणि 4,000 शेअर्सच्या दर्शनी मूल्यावरून स्टॉक स्प्लिट झाले.
* 1987 मध्ये 8,000 शेअरवर 1:1 बोनस 16000.
* 1989 मध्ये 1:1 बोनससह 16,000 शेअर्सचे 32000 झाले.
* 1992 मध्ये 32,000 शेअरवर 1:1 बोनस 64000.
* 1995 मध्ये 64,000 शेअर वर 1:1 बोनस.
* 1997 मध्ये 2:1 बोनससह 1,92,000 शेअर्स

1999 मध्ये शेअर्सचे विभाजन झाले आणि शेअरचे दर्शनी मूल्य 2 रुपयेवर आले. त्यावेळी 9,60,000 शेअर्स विभाजन झाले.
* 2004 मध्ये 2:1 बोनससह 28,80,000 शेअर्स
* 2005 मध्ये 1:1 बोनससह 57,60,000 शेअर्स
* 2010 मध्ये 2:3 बोनससह 96,00,000 शेअर्स
* 2017 मध्ये 1:1 बोनससह 1,92,00,000 शेअर्स
* 2019 मध्ये 1:3 बोनससह 25536000 शेअर्स

अशा प्रकारे दीर्घकाळ विप्रो कंपनीचे शेअर्स होल्ड करून या आलमनेर गावातील लोक अब्जाधीश झाले, आणि त्यांची 10000 रुपयेची गुंतवणूक सध्या वाढून 1100 कोटी रुपये झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Lottery Share of Wipro limited has given return in billions to its shareholders on 19 December 2022.

हॅशटॅग्स

Lottery Multibagger Stock(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x