3 May 2025 11:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER
x

मोदी म्हणाले सपा-आरएलडी-बीएसपी म्हणजे 'शराब', मग हे काय?

Wine, Drink, Election Rally

मेरठ : मेरठ तेथील भारतीय जनता पक्षाच्या प्रचार रॅलीत उपस्थितांना संबोधित करताना नरेंद्र मोदी यांना जोरदार पणे लक्ष केलं. त्यावेळी त्यांना समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोकदल आणि बहुजन समाज पार्टी या पक्षांना विशेष लक्ष करत त्यांच्यावर बोचरी टीका केली. त्यावेळी विरोधकांच्या या आघाडीला त्यांनी वेगळंच नाव ठेवून त्याचा अर्थ देखील सांगितला.

मोदींनी यावेळी भाषणात सपा-आरएलडी-बीएसपी म्हणजे ‘शराब’ असा थेट उल्लेख केला. सध्या लोकसभेच्या प्रचार सभा देशभर आयोजित होत असताना त्याबाबतीत देखील भाजपने मोठी आघाडी घेतल्याचे दिसते. एकाबाजूला प्रचार जोरदारपणे सुरु असताना सर्वच पक्षांकडून पैशांची देखील मोठ्याप्रमाणावर उधळण होत आहे.

परंतु त्यातही सध्या भाजपने आघाडी घेतली असेच म्हणावं लागेल. त्यात विशेष भर हा भाडोत्री कार्यकर्ते जमावण्यावर राजकीय पक्षांचा अधिक भर असतो. त्यामुळे इतक्या कडक उन्हात देखील प्रचार रॅलीत सामील होणाऱ्या भाडोत्री कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी त्यांना मोठ्याप्रमावर दारूचं वाटप देखील सुरु झालं आहे आणि अनेक ठिकाणी डोळ्यासमोर होताना दिसत आहे. त्यामुळे सपा-आरएलडी-बीएसपी म्हणजे ‘शराब’ असं म्हणणाऱ्या मोदींनी आधी भाजपच्या प्रचारातून दारू हद्दपार करावी, नाहीतर भाजपच्या युतीचा अर्थ सांगावा अशी चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या