13 June 2024 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vikas Lifecare Share Price | शेअर प्राईस 5 रुपये! शॉर्ट टर्ममध्ये दिला 75% परतावा, पुढेही रॉकेट स्पीडने परतावा IRFC Share Price | रेल्वे स्टॉकमध्ये मजबूत व्हॉल्यूम, तज्ज्ञांकडून शेअरसाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मोठा परतावा Yes Bank Share Price | येस बँक शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक प्राईस प्रथम ₹30 आणि नंतर ₹100 पर्यंत जाणार Vivo X Fold 3 Pro | विवो फोल्ड फोनवर तब्बल 25,000 रुपयांची सूट, कमाल फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | SBI बँकेची ज्येष्ठ नागरिकांसाठी खास योजना, मिळेल 7.50% व्याजासह मोठा परतावा Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! तिकीट बुकिंगपूर्वी लक्षात ठेवा हा बदल, IRCTC कडून अपडेट SBI Mutual Fund | पगारदारांसाठी SBI फंडाच्या 3 खास योजना, भविष्यातील मोठ्या खर्चाची चिंता मिटेल
x

Jindal Stainless Share Price | जिंदाल स्टेनलेस शेअर मजबूत तेजीत, फ्री बोनस शेअर्स जाहीर, स्टॉक खरेदीसाठी ऑनलाईन झुंबड

Jindal Stainless Share Price

Jindal Stainless Share Price | ‘जिंदाल स्टेनलेस लिमिटेड’ आणि ‘जिंदाल स्टेनलेस हिसार’ या कंपनीच्या शेअर मध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी ‘जिंदाल स्टेनलेस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 2.48 टक्के वाढीसह 316.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर ‘जिंदाल स्टेनलेस हिसार’ कंपनीचे शेअर्स शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.28 टक्के वाढीसह 570.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या दोन्ही कंपनीच्या शेअरमध्ये ही जबरदस्त वाढ एका बातमी मुळे पाहायला मिळत आहे. 9 मार्च 2023 रोजी या दोन कंपन्यांचे विलीनीकरण झाले आहे.

‘जिंदाल स्टेनलेस हिसार लिमिटेड’ कंपनीच्या संचालक मंडळाने ‘जिंदाल स्टेनलेस लिमिटेड’ कंपनीमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. रेकॉर्ड तारखेपर्यंत ‘जिंदाल स्टेनलेस हिसार लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स धारण करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रत्येक 1 शेअरवर ‘जिंदाल स्टेनलेस लिमिटेड’ कंपनीचे 2 शेअर मिळणार आहेत.

कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी :
‘जिंदाल स्टेनलेस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.14 टक्क्यांच्या वाढीसह 311.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या आधी कंपनीच्या शेअर्सनी 329 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये 24 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी ज्या गुंतवणूकदारांनी सहा महिन्यांपूर्वी ‘जिंदाल स्टेनलेस लिमिटेड’ कंपनीमध्ये पैसे लावले होते, त्यांना आता 150 टक्केपेक्षा जास्त परतावा मिळाला आहे.

जिंदाल स्टेनलेस हिसार कंपनीचा शेअर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NSE इंडेक्सवर 5 टक्क्यानी वाढला होता. त्यानंतर कंपनीचे शेअर 570 रुपये किंमत पातळीवर क्लोज झाले होते. त्याचवेळी मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 18 टक्के परतावा मिळवून दिला होता. मागील 6 महिन्यांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 120 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jindal Stainless Share Price return on investment after merger check details on 10 March 2023.

हॅशटॅग्स

Jindal Stainless Share price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x