9 May 2025 3:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | युद्धाचे ढग, डिफेन्स कंपनी शेअर्स तेजीत, मिळेल मोठा परतावा - NSE: MAZDOCK Apollo Micro Systems Share Price | झुंबड हा स्टॉक खरेदीला; मल्टिबॅगर शेअरने अप्पर सर्किट हिट केला - NSE: APOLLO Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअरची ही असेल पुढची टार्गेट, या अपडेटचा होणार परिणाम - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स शेअर देऊ शकतो 23 टक्केपर्यंत परतावा, महत्वाची अपडेट आली - NSE: RELIANCE Yes Bank Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले, येस बँक शेअर्स रॉकेट तेजीत, अपडेट नोट घ्या - NSE: YESBANK Tata Motors Share Price | पडझडीतही गुंतवणूकदारांकडून मोठी खरेदी, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी BUY रेटिंग - NSE: HAL
x

Infosys Share Price | एका बातमीने इन्फोसिस शेअर्समध्ये पडझड, स्टॉक 5 महिन्याच्या नीचांकावर आले, स्वस्तात खरेदी करावा?

Infosys Share Price

Infosys Share Price | मागील काही काळापासून आयटी क्षेत्र मंदीच्या गर्तेत अडकला आहे. सध्या अमेरिकेत आलेल्या बँकिंग सेक्टरमधील संकटामुळे बँकांसोबत आयटी क्षेत्र देखील संकटात आला आहे. मागील एक वर्षापासून दिग्गज आयटी कंपनी ‘इन्फोसिस’ चे शेअर्स देखील कमजोर झाले आहेत. बुधवार दिनांक 15 मार्च 2023 रोजी ‘इन्फोसिस’ कंपनीचे शेअर्स 0.063 टक्के वाढीसह 1,420.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘इन्फोसिस’ कंपनीचे शेअर्स 5 महिन्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.  (Infosys Limited)

स्टॉकमधील चढ-उताराचा कारण :
‘इन्फोसिस’ कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनीचे अध्यक्ष मोहित जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा 11 मार्च 2023 रोजी स्वीकृत करण्यात आला. मोहित जोशी 9 जून 2023 पर्यंत आपल्या पदावर काम करत राहतील. मागील तीन महिन्यांत कंपनीला बसलेला हा दुसरा सर्वात मोठा धक्का आहे. ही बातमी येताच शेअर बाजारात खळबळ उडाली आणि ‘इन्फोसिस’ कंपनीचे शेअर्स आपल्या पाच महिन्याच्या नीचांक किमतीवर आले होते. मोहित जोशी यांच्यावर कंपनीने अनेक मतोह्या जबाबदाऱ्या टाकल्या होत्या. आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मोहित जोशी ऑगस्ट 2016 मध्ये इन्फोसिसमध्ये रुजू झाले होते.

मागील एका महिनाभरात ‘इन्फोसिस’ कंपनीचे शेअर 11.03 टक्के कमजोर झाले आहेत. या कालावधीत सेन्सेक्स 5 टक्क्यांनी घसरला आहे. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के कमजोर झाले आहेत. हे संकेत ‘इन्फोसिस’ या आयटी कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी चांगले नाही. मागील एका वर्षात ‘इन्फोसिस’ कंपनीचे शेअर्स 22.75 टक्के घसरले आहेत. नक्कीच हा काळ कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी फार निराशाजनक राहिला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price 500209 return on investment check details on 15 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(83)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या