नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकही जागा लढवत नसलेल्या राज ठाकरे यांना आपल्या आगळ्यावेगळ्या प्रचारशैलीद्वारे भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना अक्षरशः हैराण करून सोडल्याचे दिसले. त्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे राज्यातील संपूर्ण भाजप पक्ष आणि मंत्री काँग्रेस – राष्ट्रवादीला विसरून एकट्या राज ठाकरेंवर केंद्रित झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, ‘ए लाव रे तो व्हि़डीओ’ असे म्हणत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या धोरणांची पोलखोल केली होती. त्यामुळे प्रचाराच्या ऐन रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाला बॅकफूटवर जावे लागले होते. दरम्यान, ‘लोकमत’ समूहाचे संपादकीय संचालक ऋषी दर्डा आणि ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक यदु जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज ठाकरे यांच्या आक्रमक भाषणांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे आधी आपले प्रशंसक होते. परंतु, आता त्यांनी मोदी-शहा यांच्या विरोधात रान उठविले आहे. याबद्दल आपल्याला काय वाटते?
हा राजकारणाचा भाग आहे. आजकाल ‘आउटसोर्सिंग’ केले जाते. हे देखील त्याप्रमाणेच आहे. मात्र जनता हुशार आहे. कोण काय आणि कशासाठी बोलत आहे हे जनतेला नीट कळते. मतदानातून ते दाखवून देतात. गुजरातमध्येही विधानसभा निवडणुकीत असेच ‘आउटसोर्सिंग’ झाले होते. काही तरुणांना काँग्रेसी लोकांनी हाताशी धरून त्यांचा वापर करून घेतला, पण त्याने तेव्हाही काही साध्य झाले नाही.

वास्तविक मोदी स्वतःला इमानदार व्यक्ती म्हणतात आणि जर तसे असेल त्यांनी सर्व प्रश्नांना उत्तर देणं अपेक्षित होत. त्यामुळे आपण योग्य आहोत हे देखील सिद्ध झालं असतं. मात्र जे राज ठाकरे यांनी मांडलं हे असत्य आहे असं बोलण्याचं देखील मुलाखतीत त्यांना धाडस झालं नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मूळ प्रश्नांना बगल देऊन त्यांनी स्वतःभोवतीच संशयाचं वलय गडद केलं आहे असं म्हणावं लागेल. त्यामुळेच त्यांनी थातुर-मातुर प्रतिक्रिया देऊन वेळ मारून घेतली असंच म्हणावं लागेल.

‘त्या’ मुलाखतीत राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या मूळ प्रश्नांना मोदींकडून बगल