9 May 2025 6:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Auro Laboratories Share Price | 'ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड' शेअर एका दिवसात 20 टक्के वाढला, अचानक शेअर खरेदी वाढण्याचं कारण?

Auro Laboratories Share Price

Auro Laboratories Share Price | ‘ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड’ या फार्मा सेक्टरशी संबंधित कंपनीच्या शेअरमध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे. काल ट्रेडिंग सेशन दरम्यान ‘ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 97.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

‘ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 102.20 रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी ‘ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 6.19 टक्के घसरणीसह 91.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

स्टॉकमधील तेजीचे कारण :
ऑरो लॅबोरेटरीज कंपनीच्या स्टॉकमध्ये ही जबरदस्त तेजी तिमाही निकालानंतर पाहायला मिळाली आहे. 16 मे 2023 रोजी ‘ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड’ कंपनीने मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. या दिवशी शेअर 70 रुपये किमतीच्या खाली ट्रेड करत होता. मार्च 2023 तिमाहीत कंपनीने 1.78 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ‘ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड’ कंपनीच्या निव्वळ नफ्यात 291.78 टक्के वाढ झाली आहे. मार्च 2003 च्या तिमाहीत ‘ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड’ कंपनीचा EBITDA 2.97 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत EBITDA 149.58 टक्के वाढला आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ विक्रीमध्ये 25 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. या तिमाहीत कंपनीची एकूण विक्री 13.52 कोटी रुपये झाली आहे.

स्टॉक परफॉर्मन्स आणि परतावा :
ऑरो लॅबोरेटरीज कंपनीच्या स्टॉकने मागील सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी गुंतवणूकदारांनी 29 टक्के परतावा कमावला आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 53 टक्के परतावा कमावून दिला आहे. गेल्या एका महिन्यात ‘ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअर धारकांनी 47 टक्के परतावा कमावला आहे. तर मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 36.57 टक्के मजबूत झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Auro Laboratories Share Price today on 19 May 2023

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Auro Laboratories Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या