3 May 2025 4:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेश निवडणुकीत भ्रष्टाचार मुख्य मुद्दा! सत्ता जाण्याचे सर्व्ह येताच एमपी मंत्रालयात आग, अनेक फाईल्स राख

Bhopal Satpura Bhawan Fire

MP Satpura Bhawan Fire | मध्य प्रदेश सरकारचे मुख्य कार्यालय असलेल्या सातपुडा भवनात सोमवारी सायंकाळी भीषण आग लागली. सातपुडा भवनात मध्य प्रदेश सरकारच्या अनेक संचालनालयांची कार्यालये आहेत. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. येथे आदिम जाती विकास प्रकल्पाचे कार्यालय आहे.

भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा – अनेक कागदपत्रे जळून खाक

दरम्यान, या आगीत आरोग्य संचालनालयाची अनेक कागदपत्रे जळून खाक झाल्याची माहिती मीडिया सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव होण्याचे संकेत अनेक सर्व्हेत मिळाले आहेत. तसेच काँग्रेसने आत्तापासूनच प्रचार सुरु केला असून त्यात भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा केला आहे.

मध्य प्रदेश सरकारचे सचिवालय वल्लभ भवन येथे आहे. त्याच्या समोर उजव्या आणि डाव्या बाजूला सातपुडा आणि विंध्याचल भवन आहेत. या इमारतींमध्ये राज्यातील बहुतांश विभागांचे संचालनालय आहे. ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी मध्य प्रदेश आरोग्य संचालनालयाच्या अनेक शाखा कार्यरत आहेत. सतपुडा भवनची सुरक्षा पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुपारी चार वाजता तिसऱ्या मजल्यावरून जोरदार आगीच्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्या. यानंतर संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली.

अधिकारी व कर्मचारी इमारतीबाहेर आले. संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. बराच प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.

काय आहे आग लावण्याचे षडयंत्र?

नेमकी निवडणुकीच्या वेळीच या मंत्रालय विभागात आग लागते. या संचालनालयात आग लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी १४ डिसेंबर २०१८ रोजी (विधानसभा निवडणुकीपूर्वी) सातपुडा भवनात भीषण आग लागली होती. त्यानंतरही अनेक गोपनीय कागदपत्रे आगीत जळून खाक झाली होती. त्यानंतर राज्यात निवडणुका झाल्या आणि काँग्रेसने बाजी मारली. कमलनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या तीन दिवस आधी म्हणजे 17 डिसेंबरला लागलेल्या आगीत अनेक कागदपत्रे जळून खाक झाली होती. त्यानंतर संचालनालयातील आगीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. कालांतराने काँग्रेसचं सरकार आमदारांच्या राजकीय सौदेबाजीतून पाडण्यात आलं होतं.

आता काही महिन्यांनी मध्य प्रदेशात पुन्हा निवडणुका होणार आहेत. अशा तऱ्हेने भीषण आगीचा उद्रेक अनेक प्रश्नांना जन्म देत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा केला आहे. तसेच सत्ता ज्याचे संकेत मिळाल्यानंतर पुन्हा आगीचे सत्र सुरु झाले असून त्यात महत्वाची कागदपत्र जाळून राख होतं आहेत हे विशेष म्हणावे लागेल.

News Title : Bhopal Satpura BhawanMP government building under fire before assembly election check details on 12 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bhopal Satpura Bhawan Fire(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या