4 May 2025 12:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग शेअरमध्ये प्रॉफिट बुकींग सुरू, स्टॉक किंमत स्वस्त झाली, तपशील वाचून पैसे गुंतवा

Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price | मागील काही दिवसांपासून पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज हा स्टॉक विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहे. आज पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये लोअर सर्किट पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह ट्रेड करत होते.

मागील 6 महिन्यांत पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 187.49 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 19 जुलै 2023 रोजी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 5.02 टक्के घसरणीसह 47.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सनी 48 रुपये किंमत स्पर्श केली होती. तर मंगळवार दिनांक 28 मार्च 2023 रोजी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 14 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 49.95 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 13.15 रुपये होती.

पटेल इंजिनिअरिंग ही कंपनी मुख्यतः धरण बांधणी, पूल, बोगदा, रस्ता, पायलिंग, औद्योगिक संरचना आणि अवजड स्थापत्य अभियांत्रिकी प्रकल्प संबंधित व्यवसाय करते. पटेल इंजिनिअरिंग कंपनी जलविद्युत, सिंचन आणि पाणी पुरवठ्याबरोबरच शहरी पायाभूत सुविधा आणि वाहतूक संबंधित विविध कामे देखील करते.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी देखील पटेल इंजिनिअरिंग कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. विजय केडिया यांनी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे 1.68 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 59.70 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 1 वर्षात पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 121.37 टक्के परतावा कमावून दिला आहे.

पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सनी मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे जबरदस्त निकाल जाहीर केले होते. तर कंपनीने 1298 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या तिमाहीत कंपनीच्या एकूण नफा 83 कोटी रुपये नोंदवला गेला होता. पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या ऑर्डर बुकचे मूल्य 20,000 कोटी रुपये आहे. 30 ऑगस्ट 2019 रोजी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 7 रुपये या आपल्या नीचांकी किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून शेअरची किंमत 6 पट अधिक वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Patel Engineering Share Price today on 19 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Patel Engineering Share Price(36)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या