16 May 2024 6:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

INDIA Vs NDA | नितीशकुमार नाराज नाहीत, गोदी मीडियाला हाताशी धरून भाजप नेते पसरवत आहेत अफवा, JDU ने हवाच काढली

INDIA Vs NDA

INDIA Vs NDA | बेंगळुरूमध्ये २६ विरोधी पक्षांच्या संयुक्त बैठकीनंतर केवळ अनेक बातम्या येत आहेत. विशेष म्हणजे भाजप पेक्षा गोदी मीडिया अधिक आदळआपट करताना दिसत आहेत आणि त्यासाठी अफवांचा आसरा घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. विरोधकांच्या आघाडीमुळे आणि त्यांच्या रणनीतीमुळे मोदी देखील अस्वस्थ असल्याचं स्पष्ट जाणवू लागलं आहे. काल तर एका सरकारी कार्यक्रमाला त्यांनी राजकीय रूप देतं थेट राजकीय भाषण सुरु केलं आणि त्यातील त्यांचे हावभाव त्यांचा त्रागा स्पष्ट करत होता.

आता गोदी मीडियाने नितीश कुमार यांच्याबद्दल अफवा पसरविण्यास सुरुवात केल्याचं दिसू लागलंय. वास्तविक कालच्या विरोधकांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी नितीश कुमार यांची फ्लाईट असल्याने त्यांना पत्रकार परिषदेत उपस्थित राहता आलं नाही हे आधीच स्पष्ट केलेलं असताना आता अफवा पसरवली जातं असताना JDU (युनाइटेड) व बातमीतील हवाच काढून टाकली आहे.

भाजपप्रणीत ३८ पक्षांच्या एनडीएला टक्कर देण्यासाठी भाजपविरोधी पक्षांनी आपल्या आघाडीचे नाव इंडिया ठेवले आहे आणि दुसरे म्हणजे या संपूर्ण विरोधी ऐक्याचे शिल्पकार असलेले बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे नेते नितीशकुमार नाराज झाले आहेत अशी वृत्त गोदी मीडियाने पसरवली. पण आता जेडीयूच्या नेत्यांनी सांगितले आहे की, नितीशकुमार नाराज नाहीत आणि नियोजित वेळापत्रकानुसार ते बेंगळुरूहून पाटण्याला परतले, ज्यामुळे ते किंवा लालू यादव किंवा तेजस्वी यादव हे संयुक्त पत्रकार परिषदेत दिसले नाहीत. जेडीयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरं तर नितीश यांनी 11 सदस्यीय समन्वय समिती स्थापन करण्याची सूचना केली होती, ज्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषदेत चर्चा केली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार यांनी पाटणा विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला नाही, बेंगळुरूतील पत्रकार परिषदेच्या चर्चेला माध्यमांमध्ये स्थान मिळावे आणि नितीश यांच्या बातमीने त्या बातमीचे कव्हरेज खाऊ नये यासाठी त्यांनी रणनीतीला जास्त दिल्याचं वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार आणि तेजस्वी यादव आज बुधवारी मलमास मेळाव्याचे उद्घाटन करण्यासाठी राजगीरला जाणार आहेत, जिथे ते बेंगळुरू बैठक आणि विरोधकांच्या ऐक्यावर माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे.

काय अफवा पसरवली?
नितीश कुमार बेंगळुरूहून गेल्यानंतर नितीश कुमार दोन कारणांमुळे नाराज असल्याचे वृत्त पसरवले गेले. एक तर श्रीमंत-गरीब अशी दरी दाखवण्यासाठी अनेक डावे नेत्यांचा प्रतीक म्हणून वापरत असलेल्या युतीला ‘इंडिया’ नाव देण्यास त्यांचा विरोध होता अशी अफवा पसरवली गेली. दुसरं म्हणजे विरोधी पक्षांच्या दुसऱ्या बैठकीत संयोजकाची घोषणा होईल, अशी आशा नितीश कुमार यांना होती, त्या पदावर ते साहजिकच दावा करतात. पण जेडीयूच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, नितीश नाराज झाल्याची बातमी ही एक अफवा आहे जी भाजपचे लोक गोदी मीडिया मार्फत पसरवत आहेत.

News Title : INDIA Vs NDA CM Nitish Kumar Stand check details on 19 July 2023.

हॅशटॅग्स

#INDIA Vs NDA(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x