4 May 2025 5:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

भाजपाची सत्ता असलेल्या मणिपूर घटनेने देशाची मान खाली गेली, नग्न करून बलात्कार करण्यात आलेल्या महिलेचा पती कारगिल युद्धातील सैनिक

Manipur viral video

Manipur Crisis | मणिपूरमध्ये भाजपाची सत्ता आहे आणि त्यासोबत केंद्रात देखील भाजपाची सत्ता आहे. तरी देखील मागील ३ महिने मणिपूरमध्ये हिंसाचार आणि रक्तपात सुरु आहे. २०१९ मध्ये तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभांच्या स्टेजवर CRPF शहिदांचे फोटो लावून मतं मागितली होती. मात्र अटलबिहारी वाजपेयींच्या काळातील कारगिल युद्धातील आठवणी आजही देशाच्या मनात आहेत. मात्र आज देशाची मान शरमेने खाली जाईल अशी माहिती समोर आली आहे. होय! मणिपूरमध्ये नग्न करून फिरविण्यात आलेली आणि नंतर बलात्कार करण्यात आलेली महिला त्याच कारगिल युद्धातील सैनिकाची पत्नी होती.

एका वृत्तपत्राशी बोलताना ६५ वर्षीय निवृत्त सैनिकाची पत्नी आणि छळाला बळी पडलेली महिला म्हणते की, तिच्यासाठी सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. घरातील वस्तूंपासून ते सन्मानापर्यंत सर्व काही गमावल्याचे त्यांनी सांगितले. हजारो लोकांसमोर आम्हा दोन महिलांना बंदुकीचा धाक दाखवून कपडे उतरवण्यास भाग पाडण्यात आले. आम्ही कपडे उतरवले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली होती.

माझं घर देशाच्या सीमेपेक्षा जास्त धोकादायक – माजी सैनिक

कारगिलमध्ये लढणारी लढाई मी समोरून पाहिली आहे आणि जिद्दीने लढलो आहे. पण आज मी घरी परत आहे, तेव्हा माझी स्वतःचं घर युद्धभूमीपेक्षा जास्त भयानक आणि धोकादायक आहे हे अनुभवलं. ४ मे रोजी मोठा जमाव आमच्या गावात आला आणि त्यांनी घरांना आग लावायला सुरुवात केली. सर्व गावकरी जीव वाचवण्यासाठी धडपडत होते. माझ्या पत्नीने मला वेगळे केले आणि इतर चार गावकऱ्यांसह जंगलातील एका झाडामागे लपली.

महिलांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुरुषांना ठार केले

जमावातील काही हल्लेखोरांनी आमच्या शेळ्या, डुक्कर आणि कोंबड्या पकडल्या आणि गावात गेले, जिथे माझी पत्नी आणि इतर लोकं सापडली आणि त्यांना जमावाकडून बंदिस्त करण्यात आले. या अपघातात महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात असलेले वडील आणि भाऊ जागीच ठार झाले. पत्नीसह अजून एक महिला आणि वडील, मुलगा-मुलगी असे एकाच कुटुंबातील इतर तीन सदस्य होते. जमावाने पोलिसांकडून सर्वांना हिसकावून घेतले आणि त्यांना पळवून नेले. मात्र त्यानंतर पोलीस केवळ बघ्याच्या भूमिकेत आणि जमावाला पोषक हालचाली करू लागले हे दिसत होतं.

माझ्या डोळ्यासमोर पत्नीला घेऊन गेले

“मी पाहिलं की ते पत्नी आणि इतर चार पुरुषांना काही अंतरावर घेऊन गेले,असं माजी सैनिकाने जमावाची आठवण सांगितली. त्यातील तीन महिलांना जबरदस्तीने कपडे उतरवावे लागले. त्यानंतर हातात बाळ असलेल्या महिलेला सोडून देण्यात आले. जमावाने अल्पवयीन महिलेचा छळ करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा तिचा भाऊ आणि वडिलांनी हस्तक्षेप केला तेव्हा त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना जवळपास दोन-तीन तास सुरु होती असं त्यांनी सांगितलं. रात्री उशिरा नागा गावात ते आपल्या पत्नीला भेटले आणि लहान मुलगी तिच्या प्रियकरासोबत निघून गेली. सध्या हे पती-पत्नी चुराचंदपूर येथील मदत छावणीत राहत आहेत.

News Title : Manipur viral video incident women forced to walk naked husband army veteran Kargil war gangraped 21 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Manipur viral video(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या