16 May 2024 3:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये Apar Industries Share Price | श्रीमंत करणारा शेअर! अवघ्या 2 वर्षात दिला 1298 टक्के परतावा, खरेदी करणार? Bonus Shares | पटापट फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी दिला 6300% परतावा
x

Future Retail Share Price | 3 रुपये 80 पैशाच्या फ्युचर रिटेल शेअर्सची खरेदी वाढली, नेमकं कारण काय? लेटेस्ट अपडेट जाणून घ्या

Future Retail Share Price

Future Retail Share Price | फ्युचर रिटेल कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून तेजीत वाढत आहेत. आज देखील स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. मागील पाच दिवसांपासून फ्युचर रिटेल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या दरम्यान हा स्टॉक 13.43 टक्के वाढला आहे. फ्युचर रिटेल कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी येण्याचे विशेष कारण म्हणजे, ही कर्जबाजारी कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे, आणि लवकरच या कंपनीचा लिलाव होऊ शकतो, अशी बातमी आली आहे.

2017 मध्ये फ्युचर रिटेल कंपनीचे शेअर्स 645 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता या कंपनीचे शेअर्स तब्बल 99 टक्के खाली आले आहे. आज शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी फ्युचर रिटेल कंपनीचे शेअर्स 4.11 टक्के वाढीसह 3.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्यूनलने फ्युचर रिटेल कंपनीची दिवाळखोरी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 17 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदत वाढ दिली आहे. सेबीला दिलेल्या माहितीत कंपनीने कळवले आहे की, NCLT च्या मुंबई खंडपीठाने फ्युचर रिटेल कंपनीला कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रिझोल्यूशन प्रोसेसमधून 33 दिवसांसाठी सुट देण्याची परवानगी दिली आहे. फ्युचर रिटेल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, “NCLT ने 17 जुलै 2023 रोजी फ्युचर रिटेल कंपनीची बाजू ऐकून घेतली आणि CIRP मधून 33 दिवसांची सूट दिली”.

आता NCLT ने फ्युचर रिटेल कंपनीची CIRP प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 17 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी NCLT खंडपीठाने CIRP प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 जुलै 2023 पर्यंत मुदत दिली होती. मागे देखील कंपनीला 90 दिवसांचा अतिरिक्त कालावधी वाढवून देण्यात आला होता. दिवाळखोरी संहिताअंतर्गत, CIRP दाव्यासाठी आवश्यक प्रक्रिया 330 दिवसांत पूर्ण करणे बंधनकारक आहे.

मात्र फ्युचर रिटेल कंपनी विरुद्ध कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रिया 20 जुलै 2022 रोजी NCLT अधिनियम कलम 12 ( 1 ) नुसार सुरू झाली होती. CIRP प्रक्रिया सुरू झाली की, किमान 180 दिवस आणि कमाल 330 दिवसांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण होणे कायदेशीर बंधनकारक असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Future Retail Share Price today on 21 July 2023.

हॅशटॅग्स

Future retail share price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x