17 May 2024 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक 'हाय रिस्क' वर, तज्ज्ञांचा Sell करण्याचा सल्ला, किती घसरणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, संधी सोडू नका Rajnish Retail Share Price | अवघ्या 63 पैशाचा शेअर! 4 वर्षात दिला 14000% परतावा, स्टॉक आजही स्वस्त आणि फायद्याचा Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक ब्रेकआऊट लेव्हल अपडेट, शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा सल्ला काय?
x

Yatharth Hospital IPO | सध्या IPO मालामाल करत आहेत, आता यथार्थ हॉस्पिटल IPO लाँच होतोय, पैसे तयार ठेवा, तपशील जाणून घ्या

Yatharth Hospital IPO

Yatharth Hospital IPO | सध्या भारतीय शेअर बाजार आपल्या उच्चांक पातळी जवळ ट्रेड करत आहे. अशा काळात जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. या आठवड्यापासून आणखी एका कंपनीचा IPO बाजारात लाँच होणार आहे. 26 जुलै 2023 पासून यथार्थ हॉस्पिटल अँड ट्रॉमा केअर सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा IPO शेअर बाजारात लाँच केला जाणार आहे.

28 जुलै 2023 पर्यंत हा IPO गुंतवणुकीसाठी खुला असेल. यथार्थ हॉस्पिटल कंपनीने आपल्या IPO साठी प्रति इक्विटी शेअर किंमत बँड 285 ते 300 रुपये निश्चित केली आहे. अँकर गुंतवणूकदार 25 जुलै 2023 पासून स्टॉक खरेदी करू शकतात.

यथार्थ हॉस्पिटल कंपनीच्या IPO मध्ये विमला प्रेम नारायण आणि नीना त्यागी हे प्रवर्तक आपले 490 कोटी रुपये मूल्याचे 65.51 लाख इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकणार आहेत. यथार्थ हॉस्पिटल कंपनी IPO मधून जमा झालेली रक्कम कर्जाची परतफेड करण्यासाठी खर्च करणार आहे. यासह ही कंपनी स्वतःच्या नोएडा रुग्णालय स्थित आणि ग्रेटर नोएडा स्थित रुग्णालयावर तसेच त्यांच्या उपकंपन्या AKS आणि रामराजा द्वारे चालवल्या जाणाऱ्या इतर रुग्णालयांवर काही पैसे खर्च करून सुधारणा करणार आहे.

यथार्थ हॉस्पिटल कंपनीने प्रत्येकी 300 रुपये किमतीवर 40 लाख इक्विटी शेअर्सच्या प्री- IPO प्लेसमेंटद्वारे 120 कोटी भांडवल उभारणी केली आहे. यथार्थ हॉस्पिटल कंपनीच्या IPO इश्यूचा आकार 490 कोटी रुपये असेल. या कंपनीने आपल्या IPO मध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी 50 टक्के कोटा राखीव ठेवला आहे. तर 15 टक्के राखीव कोटा गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ठेवला आहे. 35 टक्के राखीव कोटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी असेल.

यथार्थ हॉस्पिटल कंपनीच्या प्रत्येक इक्विटी शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये निश्चित करण्यात आले आहे. IPO शेअर ची किंमत बँड दर्शनी किमतीच्या 28.5 पट अधिक आहे. तर आणि कॅप किंमत इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 30.0 पट अधिक आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yatharth Hospital IPO today on 21 July 2023.

हॅशटॅग्स

#Yatharth Hospital IPO(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x