14 May 2025 1:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | पॉवर कंपनी पेनी स्टॉकमध्ये तेजी, तुमची खरेदी केला? यापूर्वी 1442% परतावा दिला - NSE: JPPOWER IRB Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये 2.84% तेजी; पुढे रॉकेट तेजीचे संकेत; संधी सोडू नका - NSE: IRB Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये तेजी; शेअर प्राईसमध्ये मोठी तेजी दिसणार, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON Reliance Share Price | एसबीआय सिक्युरिटीज बुलिश, बाय कॉल सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर्सची जोरदार खरेदी, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: BEL BEL Share Price | तज्ज्ञांकडून ओव्हरवेट रेटिंग जाहीर, हि आहे पुढची अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: BEL HAL Share Price | डिफेन्स शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर, जोरदार खरेदी सुरु, BUY रेटिंग जाहीर - NSE: HAL
x

जेवढे मनसेचे कार्यकर्ते आहेत, तेवढेच रस्त्यावर खड्डे आहेत, अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मनसे आणि अमित ठाकरेंची खिल्ली उडवली

Actress Dipali Sayyed

Dipali Sayyed | आगामी लोकसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. एकाबाजूला शिवसेनेत फूट पडूनही ठाकरे यांची शिवसेना मजबूत स्थितीत असल्याचं दिसतंय. मातोश्रीवर लोकसभा निवडणुकीसाठी जोरबैठका सुरू आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही सभांवर भर दिला आहे. तर भाजप, शिंदे आणि अजितदादा गटानेही सभांवर भर दिला आहे.

मनसे लोकांच्या चर्चेतून निघून गेल्याच चित्र

मात्र यामध्ये मनसे लोकांच्या चर्चेतून निघून गेल्याच चित्र आहे. किंबहुना आगामी निवडणुकीत मनसेची अवस्था अत्यंत बिकट होईल असा राजकीय अंदाज व्यक्त होतोय. एका बाजूला शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष प्रत्यक्ष सभा आणि बैठकांचा सपाटा लावत असताना मनसे ‘रील-बाज’ अशा इव्हेन्टवर फोकस होऊन स्वतःच्या राजकीय नुकसानात अजून भर घालत आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंविरोधी आणि शिंदे-भाजप पुरस्कृत भूमिका घेतल्याने मनसेबद्दल लोकांच्या मनात नाराजी आहे. तसेच मनसे सध्याच्या राजकीय वातावरणात एकाबाजूला ढकलला गेला आहे.

शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) थेट लोकांमध्ये सभा

मात्र आता मनसेनेही थेट लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) थेट लोकांमध्ये सभा घेत आहेत, तसेच अनेक वरिष्ठ पदाधिकारी अनेक विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. आता संथगतीने का होईना पण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि सूचना केल्या जात आहेत. मनसेने मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यावर अधिक फोकस केला आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाचं नुकसान होईल हे सांगणं कठीण असलं तरी मनसेला नेमका काय फायदा होईल हाच संशोधनाचा विषय आहे. पक्षाला राज्यात किती फायदा होईल यापेक्षा ठाणे आणि पालघरमध्ये एका विशिष्ठ नेत्याला काय फायदा होईल यावर अधिक भर असल्याचं पाहायला मिळतंय.

दरम्यान, मनसे नेते अविनाश जाधव यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर भाष्य केलं. आगामी लोकसभा निवडणुका संदर्भात चर्चा झाली. कार्यकर्त्यांनी काय करावं? पदाधिकाऱ्यांनी काय करावे या संदर्भात देखील चर्चा झाली आहे. पुढच्या सहा महिन्यात घराघरांमध्ये महाराष्ट्र सैनिक पोहोचणार आहे, असं अविनाश जाधव यांनी सांगितलं.

दीपाली सय्यद यांची मनसेवर टीका

आता शिंदे गटाच्या दीपाली सय्यद यांनी मनसेची खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळतंय. अभिनेत्री दीपाली सय्यद अखेर निवडणूक लढणार आहे. विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक लढण्याची दीपाली सय्यद यांनी तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर अखेर दीपाली सय्यद निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अमित ठाकरेंची देखील खिल्ली उडवली

यावेळी दीपाली सय्यद यांनी मनसेच्या आंदोलनावर टीका केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके आणि गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घ्यावी. राज्यभरात जेवढे मनसेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे! दोन दिवसाचे काम आहे. राज्यात जेवढे मनसेचे कार्यकर्ते आहेत, तेवढेच रस्त्यावर खड्डे आहेत, अशी खोचक टीकाही दीपाली सय्यद यांनी केली आहे. उगाच जेलमध्ये महिना भर खाऊन देशाचे नुकसान कशाला करता? बाहेर स्टंटबाजी कशाला करता युवा नेत्यांना घराबाहेर काढून कामाला लावा, असा टोला दीपाली सय्यद यांनी लगावला आहे.

News Title : Actress Dipali Sayyed slams MNS check details on 19 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Actress Dipali Sayyed(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या