10 May 2025 6:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
National Pension Scheme | पगारदारांना महिना 1000 रुपये गुंतवणुकीतून प्रति महिना 1 लाख रुपये फिक्स पेन्शन मिळणार Gratuity Money Amount | तुमचा महिना पगार किती? खाजगी कंपनी नोकरदारांना ग्रॅच्युईटीचे 1,06,731 रुपये मिळणार EPFO Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला महिना रु.7500, रु.6429, रु.5357 की रु.4286 पेन्शन मिळणार? अपडेट आली Horoscope Today | 11 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 11 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | खुशखबर! मल्टिबॅगर पेनी स्टॉक फोकसमध्ये, जोरदार तेजीचे संकेत - NSE: RPOWER NBCC Share Price | 28 टक्के कमाईची संधी मिळतेय, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC
x

TRF Share Price | मल्टिबॅगर टीआरएफ शेअर! मोठी अपडेट आली समोर, टाटा स्टील शेअरला देखील फायदा होणार

TRF Share Price

TRF Share Price | टीआरएफ लिमिटेड या टाटा समूहाचा भाग असलेल्या मायक्रो कॅप कंपनीचे ब्बाजार भांडवल 229.38 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी या कंपनीचे शेअर्स 208.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शुक्रवारी हा स्टॉक दिवसभरच्या ट्रेडिंगमध्ये 19 टक्क्यांच्या वाढीसह 221.70 रुपये किमतीवर पोहोचला होता. टीआरएफ लिमिटेड ही कंपनी टाटा स्टील कंपनीमध्ये विलीन केली जाणार आहे. या बातमीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची उसळी पाहायला मिळाली आहे. (Tata Steel Share Price)

टाटा स्टील कंपनीचे शेअर्स देखील शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.30 टक्क्यांच्या वाढीसह 116.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. गुरुवार दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, टीआरएफ लिमिटेड ही कंपनी टाटा स्टील कंपनीमध्ये विलीन केली जाणार आहे. आज सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी टीआरएफ लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.26 टक्के घसरणीसह 196.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणजेच NCLT च्या मुंबई खंडपीठाने टीआरएफ लिमिटेड कंपनीला विलीनीकरण बाबत 18 सप्टेंबर 2023 रोजी शेअर्सधारकांची बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी 11 सप्टेंबर 2023 ही ई-व्होटिंगची कट ऑफ डेट म्हणून जाहीर करण्यात आली होती. टीआरएफ लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 177 कोटी रुपये ऑपरेटिंग महसूल संकलित केला आहे.

मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 127 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्याच वेळी या कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 88 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 16 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

मागील एका महिन्यात TRF लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 8.54 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 25.01 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 36.66 टक्के परतावा कमावून दिला आहे.

टाटा स्टील कंपनी आपल्या 7 उपकंपन्यांचे विलीनीकरण करण्याची योजना आखत आहे. हा विलीनीकरणाच्या योजनेला टाटा स्टील कंपनी संचालक मंडळाने देखील मान्यता दिली आहे. या विलीन होणाऱ्या कंपन्यांमध्ये TRF लिमिटेड, टाटा स्टील लॉग प्रॉडक्ट्स लिमिटेड, द टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड, टाटा मेटालिक्स लिमिटेड, द इंडियन स्टील अॅड वायर प्रॉडक्ट्स लिमिटेड, टाटा स्टील मायनिंग लिमिटेड, एस अँड टी मायनिंग कंपनी लिमिटेड, विलीन केले जातील.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TRF Share Price today on 21 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

TRF Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या