3 May 2025 9:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Linde India Share Price | मल्टिबॅगर लिंडे इंडिया शेअर्स पुन्हा तेजीत, महत्वाच्या अपडेटने अजून तेजीचे संकेत, तपशील जाणून घ्या

Linde India Share Price

Linde India Share Price | लिंडे इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लिडे इंडिया कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 6141.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सलग काही दिवसाच्या तेजीनंतर आज लिंडे इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे.

लिंडे इंडिया कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, कंपनीला ओडिशा राज्यात राउरकेला प्लांटमध्ये स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीकडून क्रायोजेनिक ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम मिळाले आहे. याबाबत लिंडे इंडिया कंपनीला 25 ऑगस्ट 2023 रोजी ‘लेटर ऑफ एक्सेप्टन्स’ देखील जारी करण्यात आले आहे. आज बुधवार दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी लिंडे इंडिया कंपनीचे शेअर्स 0.35 टक्के घसरणीसह 6,013.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ऑर्डर तपशील

लिंडे इंडिया कंपनीला मिळालेल्या ऑर्डरमध्ये प्लांट सुरू केल्यापासून 20 वर्षांपर्यंत बिल्ड ऑपरेट आणि मेंटेन या तत्त्वावर दररोज 1,000 टन उत्पादन क्षमता प्राप्त करण्याचे काम देण्यात आले आहे. याशिवाय ऑर्डर करारात दर पाच वर्षांच्या कालावधीनंतर कॉन्ट्रॅक्ट नूतनीकरण करण्याची तरतूद देखील असेल.

या महिन्याच्या सुरुवातीला इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून लिंडे इंडिया कंपनीला परवाना दिलेल्या साइटवर एअर सेपरेशन युनिट स्थापित करण्यासाठी जॉब वर्क ऑर्डर मंजुरी पत्र प्रदान करण्यात आले आहे. या अंतर्गत लिंडे इंडिया कंपनीला इन्स्ट्रुमेंट एअर, प्लांट एअर, क्रायोजेनिक नायट्रोजनचे उत्पादन करणे आणि IOC च्या पानिपत रिफायनरी विस्तार प्रकल्पासाठी पुरवठा करणे हे काम सामील आहे.

लिंडे इंडिया ही कंपनी मुख्यतः ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, अर्गोन आणि इतर विशेष वायू मिश्रण, निर्मिती आणि वितरण व्यवसाय करण्याचे काम करते. ही कंपनी वेल्डिंग इलेक्ट्रोड, रॉड्स, फ्लक्स, गॅस आणि इलेक्ट्रिक वेल्डिंग उपकरणे आणि द्रव ऑक्सिजन स्फोटक बनवण्याचे काम करण्यात देखील तज्ञ मानली जाते. 2023 पर्यंत लिंडे इंडिया ही कंपनी BOC India या नांवाने ओळखली जात होती. मात्र नंतर Linde ग्रुप द्वारे BOC कंपनीचे अधिग्रहण झाल्यानंतर कंपनीचे नामकरण लिंडे इंडिया असे झाले.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Linde India Share Price today on 30 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Linde India Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या