10 May 2025 1:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL
x

NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर्स अल्पावधीत देत आहेत मोठा परतावा, आता नवीन टार्गेट प्राईस तपासून घ्या

NMDC Share Price

NMDC Share Price | एनएमडीसी लिमिटेड या खाण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. अवघ्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 25.44 टक्के परतावा कमावून दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.25 टक्क्यांच्या वाढीसह 142.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

या कंपनीच्या शेअर्समधील तेजीमुळे देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने NMDC लिमिटेड कंपनीच्या स्टॉकवर ‘Buy’ रेटिंग दिली आहे. तज्ञांनी हा कंपनीच्या शेअरवर 180 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज गुरूवार दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी एनएमडीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.71 टक्के वाढीसह 148.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंपनीची आर्थिक कामगिरी

NMDC कंपनीच्याऑपरेटिंग कामगिरीचा आढावा घेतला तर आपल्याला त्या मजबूत सुधारणा पाहायला मिळेल. या कंपनीच्या वार्षिक उत्पादनात 23.1 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. त्याच वेळी कंपनीच्या सेल्समध्ये वार्षिक आधारावर 29.7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मजबूत ऑपरेटिंग कामगिरीमुळे देशांतर्गत ब्रोकरेज फर्मनी NMDC कंपनीच्या शेअरमध्ये तेजीचा अंदाज व्यक्त केला हे. तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील अधिक चांगली कामगिरी करतील.

कंपनीबद्दल थोडक्यात

NMDC लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीला नवरत्न दर्जा देण्यात आला आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी देशांतर्गत लोह आणि खाण कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीची स्थापना भारत सरकातर्फे 1958 साली करण्यात आली होती. एनएमडीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 146.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 93.60 रुपये होती. एनएमडीसी लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 41687.87 रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NMDC Share Price today on 14 September 2023

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

NMDC Share price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या