14 May 2025 6:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ITR Filing 2025 | नोकरदारांनो, ITR फाइल करताना या चुका टाळा, अन्यथा मोठा त्रास होऊन आर्थिक नुकसान होईल EPFO Money Amount | पगारदारांनो सॅलरीतून EPF कट होत असल्यास खात्यात जमा होणार 1,30,35,058 रुपये, फायद्याची अपडेट CDSL Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने घटवली रेटिंग, शेअरची टार्गेट प्राईस सुद्धा अपडेट केली - NSE: CDSL RVNL Share Price | मल्टीबैगर शेअरमध्ये तेजीचे संकेत, अपसाइड टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: RVNL IRFC Share Price | 22 टक्के तेजीचे संकेत, पीएसयू शेअर्सची जोरदार खरेदी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC Yes Bank Share Price | येस बँक शेअर्ससाठी SELL रेटिंग, पेनी स्टॉकबाबत तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत - NSE: YESBANK HFCL Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार या स्वस्त शेअरवर, रिलायन्स ग्रुपचीही हिस्सेदारी, टार्गेट नोट करा - NSE: HFCL
x

Killpest Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मागील 8 वर्षांत किल्पेस्ट शेअरने गुंतवणुकदारांना 1 लाखावर दिला 1 कोटी रुपये परतावा

Killpest Share Price

Killpest Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही किल्पेस्ट इंडिया कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. किल्पेस्ट इंडिया हा असाच एक स्टॉक आहे. किल्पेस्ट इंडिया ही कंपनी मुख्यतः कृषी रसायन क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे.

मागील 8 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर करोडो रुपये नफा कमावून दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात आणखी 46 टक्के वाढू शकतो. 14 सप्टेंबर 2023 रोजी किल्पेस्ट इंडिया स्टॉक 0.28 टक्क्यांच्या घसरणीसह 810.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी किल्पेस्ट इंडिया स्टॉक 6.05 टक्के घसरणीसह 709.10 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

8 वर्षांत करोडो रुपये परतावा
24 सप्टेंबर 2015 रोजी किल्पेस्ट इंडिया स्टॉक 7.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यांनतर हा स्टॉक 10155 टक्क्यांनी वाढून 810.15 रुपये किमतीवर पोहचला. अशाप्रकारे मागील 8 वर्षांत किल्पेस्ट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1 कोटी पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

एका वर्षात दिला 175 टक्के नफा
मागील वर्षी 29 सप्टेंबर 2022 रोजी किल्पेस्ट इंडिया कंपनीचे शेअर्स 315.05 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 11 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 867 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉक मध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव निर्माण झाला होता. म्हणून शेअरची किंमत 6 टक्के कमजोर झाली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Killpest Share Price today on 25 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Killpest Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या