7 May 2025 11:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | एक-दोन नव्हे! तब्बल 43 टक्के परतावा मिळेल, फक्त 82 रुपयांचा शेअर खरेदी करा - NSE: NHPC IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
x

Bonus Shares | श्रीमंत करतोय हा शेअर! 200 टक्के परतावा आणि आता फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, रेकॉर्ड तारीखपूर्वी फायदा घ्या

Bonus Shares

Bonus Shares | कामा होल्डिंग कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत लाभांश वाटप करण्यासाठी प्रसिद्ध मानले जातात. मात्र आता कामा होल्डिंग कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कामा होल्डिंग्ज लिमिटेड कंपनी सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कामा होल्डिंग कंपनीने 1 शेअरवर 4 मोफत शेअर्स बोनस वाटप करून दिले आहेत.

या बोनस शेअर्स इश्यूसाठी कंपनीने 17 ऑक्टोबर 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे. आज मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी कामा होल्डिंग स्टॉक 1.91 टक्के वाढीसह 15,887.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रेकॉर्ड तारीखच्या दिवशी ज्या गुंतवणूकदाराचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल, कंपनीला त्यांना 1 शेअरवर 4 बोनस शेअर्स वाटप करेल. कामा होल्डिंग्स कंपनीने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना दोन वेळा लाभांश वाटप केला आहे. या कंपनीने 21 मार्च 2023 रोजी एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून ट्रेडिंग केली होती.

त्यानंतर कामा होल्डिंग कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर 84 रुपये लाभांश वाटप केला होता. तर ऑगस्ट 2023 च्या शेवटच्या महिन्यात कामा होल्डिंग्स कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना एका शेअरवर 82 रुपये लाभांश वाटप केला होता.

कामा होल्डिंग कंपनीने 2022 मध्ये आपल्या शेअरधारकांना बायबॅक लाभ देखील दिला होता. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कामा होल्डिंग्ज कंपनीचे शेअर्स 2.96 टक्के वाढीसह 15,908.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 6 महिन्यांत कामा होल्डिंग्ज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 30 टक्के वाढवले आहेत. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares of Kama Holdings share price 10 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या