3 May 2025 1:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Vikas Ecotech Share Price | 3 रुपयाचा चिल्लर भावातील पेनी शेअर अल्पावधीत देतोय 500% परतावा, विकास इकोटेक शेअरची वेगात खरेदी

Vikas Ecotech Share Price

Vikas Ecotech Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.41 टक्क्यांच्या वाढीसह 3.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 464 कोटी रुपये आहे. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5.5 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.35 रुपये होती.

विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चिल्या मुद्द्यांची माहिती सेबीला कळवली आहे. आज मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी विकास इकोटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.23 टक्के वाढीसह 3.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने वृंदा अॅडव्हान्स्ड मटेरिअल्स लिमिटेड कंपनीच्या एकत्रीकरणाच्या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता दिली आहे. यासह प्राइस वॉटर हाऊस कूपर्स अँड कंपनी एलएलपीची या मर्जेरसाठी नियुक्ती केली आहे. वृंदा अॅडव्हान्स्ड मटेरियल्स लिमिटेड कंपनीच्या एकत्रीकरण प्रस्तावाची तपासणी करण्यासाठी प्राइस वॉटर हाऊस कूपर्स अँड कंपनी एलएलपीला सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Vrinda Advanced Materials Limited या कंपनीची स्थापना 2007 साली झाली होती. या कंपनीचे मुख्य उत्पादन केंद्र राजस्थान राज्यात स्थित आहे. ही कंपनी विशेष पॉलिमर संयुगे, कृषी उत्पादन करण्याचा व्यवसाय करते. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात या कंपनीने एकूण 192.1 कोटी रुपये कमाई केली होती आणि त्यात कंपनीचा एकूण निव्वळ नफा 9.35 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

वृंदा अॅडव्हान्स्ड मटेरियल्स ही कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त असून, कंपनीकडे एकूण 69.14 कोटी रुपये मुल्याची मालमत्ता आहे. 31 ऑगस्ट 2023 रोजी विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीचे अधिकृत भाग भांडवल 200 कोटींपर्यंत वाढवण्याचां प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

मागील तीन वर्षांत विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 500 टक्के नफा कमावून दिला आहे. सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने 2023-24 या आर्थिक वर्षात आपले कर्ज कमी करण्याची योजना आखली होती. कंपनीने हळूहळू आपले बँक कर्ज कमी करण्याची सुरुवात केली आहे. याचा कंपनीच्या निव्वळ नफ्यावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Ecotech Share Price NSE 17 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vikas Ecotech Share Price(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या