9 June 2024 6:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | NTPC सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल तगडा परतावा Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तुफान स्टॉक खरेदी सुरु NMDC Share Price | NMDC शेअरची रेटिंग अपग्रेड, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी IREDA Share Price | IREDA शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 09 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | टॉप ब्रोकरेजचा BEL शेअर खरेदीचा सल्ला, आली फायद्याची अपडेट, मोठा परतावा मिळणार Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाणून घ्या
x

Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा कंझ्युमर शेअर्स तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून टारगेट प्राईस जाहीर

Tata Consumer Share Price

Tata Consumer Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कंझ्युमर कंपनीच्या स्टॉकबाबत अनेक तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार टाटा कंझ्युमर ही कंपनी कॅपिटल फूड्स आणि ऑरगॅनिक इंडिया या दोन्ही कंपन्या ताब्यात घेणार आहे. या कंपन्यांचे अधिग्रहण केल्यानंतर, टाटा कंझ्युमर कंपनीची टॉपलाइन विक्री 10 टक्के आणि EBITDA 13-14 टक्के वाढण्याची शक्यता आहे. सध्या टाटा कंझ्युमर कंपनीने या विलीनीकरणाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाहीये.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा कंझ्युमर स्टॉक साडेतीन टक्क्यांच्या वाढीसह 1160 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी टाटा कंझ्युमर स्टॉक 0.56 टक्के घसरणीसह 1,152.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

ब्रोकरेज फर्म नुवामा इन्स्टिट्यूशनलने आपल्या अहवालात विधान केले आहे की, टाटा कंझ्युमर ज्यां दोन कंपन्यांचे अधिग्रहण करणार आहे, ते टाटा कंझ्युमर कंपनीसाठी खूप महत्त्वाचे आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या आधारावर, कॅपिटल फूड्स कंपनीचा महसूल 9 अब्ज रुपये आणि EBITDA मार्जिन 25 टक्के नोंदवला गेला होता. आर्थिक वर्ष 2021 च्या आधारावर ऑरगॅनिक इंडिया कंपनीचा महसूल 2.7 अब्ज रुपये आणि EBITDA रुपये 305 दशलक्ष रुपये नोंदवला गेला होता.

टाटा कंझ्युमर कंपनी विविध कंपनीने अधिग्रहण करून नेस्ले, आयटीसी यासारख्या मोठ्या कंपन्यांना स्पर्धा देण्याचा विचार करत आहे. कॅपिटल फूड्स कंपनीचे टाटा कंझ्युमर कंपनी द्वारे केले जाणारे अधिग्रहण नेस्ले कंपनीसाठी नुकसान कारक ठरेल. नेस्ले कंपनीच्या मॅगी ब्रँडचा मार्केट वाटा 60 टक्के आहे. आता टाटा कंझ्युमर कंपनी या सेगमेंटमध्ये देखील आक्रमकपणे खेळण्याचा विचार करत आहे.

आयटीसी आणि पतंजली यांसारख्या कंपन्यांना देखील मोठी स्पर्धा मिळणार आहे. ऑरगॅनिक फूड कंपनीच्या अधिग्रहणामुळे टाटा कंझ्युमर कंपनीचा ऑरगॅनिक उत्पादन पोर्टफोलिओ मजबूत होईल. 2025 पर्यंत ऑरगॅनिक वस्तूंची बाजारपेठ 75000 कोटी रुपयेची होईल.

या सर्व आर्थिक आणि व्यावसायिक बाबी लक्षात घेऊन ब्रोकरेज फर्मने टाटा कंझ्युमर स्टॉकवर 1255 रुपये टारगेट प्राईस निश्चित केली आहे. 11 जानेवारी 2024 च्या क्लोजिंगच्या तुलनेत ही टारगेट प्राईस 12 टक्के अधिक आहे. मार्च 2023 मध्ये टाटा कंझ्युमर कंपनीच्या स्टॉकने 686 रुपये नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मागील 10 महिन्यांत टाटा कंझ्युमर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Consumer Share Price NSE Live 15 January 2024.

हॅशटॅग्स

Tata Consumer Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x