10 May 2025 4:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला महिना रु.7500, रु.6429, रु.5357 की रु.4286 पेन्शन मिळणार? अपडेट आली Horoscope Today | 11 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 11 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | खुशखबर! मल्टिबॅगर पेनी स्टॉक फोकसमध्ये, जोरदार तेजीचे संकेत - NSE: RPOWER NBCC Share Price | 28 टक्के कमाईची संधी मिळतेय, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC NTPC Green Energy Share Price | 52% रिटर्न मिळेल, स्वस्त शेअरवर ब्रोकिंग फर्म बुलिश, फायदा घ्या - NSE: NTPCGREEN JP Power Share Price | पेनी स्टॉक मालामाल करणार; जेपी पॉवर शेअर फोकसमध्ये, टार्गेट नोट करा - NSE: JPPOWER
x

Adani Power Share Price | मल्टिबॅगर अदानी पॉवर शेअर्स 'पॉवर' दाखवणार, कंपनीकडून फायद्याची अपडेट आली

Adani Power Share Price

Adani Power Share Price | भारतातील सर्वात मोठ्या खाजगी औष्णिक वीज उत्पादक कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 570 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे.

अदानी पॉवर कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. हा तिमाहीत अदानी पॉवर कंपनीचा निव्वळ नफा अनेक पट वाढला आहे. आज मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के घसरणीसह 566.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी पॉवर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीने 2738 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत अदानी पॉवर कंपनीने 9 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-डिसेंबर 2023 या नऊ महिन्यांचा काळात अदानी पॉवर कंपनीचा निव्वळ नफा 230 टक्के वाढीसह 18,092 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या याच नऊ महिन्याच्या काळात अदानी पॉवर कंपनीने 5,484 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. अदानी पॉवर कंपनीने डिसेंबर तिमाहीत 13,355 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 8,290 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

अदानी पॉवर कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. महान याठिकाणी कंपनी 1,600 मेगावॅट क्षमतेचा ऊर्जा निर्मिती प्रकल्प पूर्ण करत आहे. अदानी पॉवर कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत 21.5 अब्ज युनिट वीज विकली होती. तर मागील वर्षी याच तिमाहीत हे प्रमाण 11.8 अब्ज युनिट्स होते. डिसेंबर 2023 च्या तिमाहीत कंपनीचा आर्थिक खर्च कमी होऊन 797 कोटी रुपयेवर आला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा आर्थिक खर्च 946 कोटी रुपये होता.

अदानी पॉवर ही कंपनी अदानी समूहाची भारतातील सर्वात मोठी औष्णिक वीज उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीने गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि झारखंड राज्यात 15,210 मेगावॅट क्षमतेची थर्मल पॉवर क्षमता स्थापित केली आहे.

गुजरात राज्यात देखील कंपनीने 40 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन केला आहे. अदानी पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,17,859.20 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 589.30 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 132.55 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Power Share Price NSE Live 30 January 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Adani Power Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या