7 May 2025 4:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

गोपनीयता व सुरक्षेमधील त्रुटी; फेसबुकला ५ बिलियन अमेरिकी डॉलर्सचा दंड

Facebook, Twitter, Instagram, Linkedin, Mark Zuckerberg, analytica, analytica data breach

वॉशिंग्टन : अमेरिकेतील नियामक प्राधिकरणानं फेसबुक या जागतिक पातळीवरील लोकप्रिय समाज मध्यामाला, माहितीची गोपनीयता आणि सुरक्षेमधील त्रुटींसंबंधित कारणांमुळे तब्बल ५ बिलियन अमेरिकी डॉलर्स एवढा प्रचंड दंड प्रस्तावित केला आहे. संबंधित निर्णयाला न्यायिक विभागाची अधिकृत मान्यता मिळाल्यास या प्रकरणी ठोठावण्यात आलेला आतापर्यंतचा हा इतिहासातील सर्वाधिक दंड असेल.

अमेरिकेतल्या विविध माध्यमांनी ही बातमी दिली आहे. अमेरिकेची फेडरल ट्रेड कमिशन (FTC) ही संस्था या गैरव्यवहाराचा तपास करत होती. केंब्रिज अनॅलिटीक या कंपनीवर आरोप होते की त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून ८ कोटी ७० लाख युझर्सच्या खाजगी डेटाचा गैरवापर केला. हाच डेटा या ब्रिटिश कंपनीने २०१६ अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रंप यांना पुरवला, ज्याचा त्यांना फायदा झाला.

दरम्यान फेसबुकला ठोठवण्यात आलेल्या दंडाची रक्कम ही टेक्नॉलॉजी कंपनीतील दंडातील रक्कमेपेक्षा सर्वाधिक आहे. याआधी २०१२ मध्ये गुगलकडून १५४ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#facebook(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या