20 May 2024 11:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Adani Energy Solutions Share Price | सुवर्ण संधी! अदानी एनर्जी सोल्युशन्स शेअर देईल 60% परतावा, टार्गेट प्राइस तपासून घ्या

Adani Energy Solutions Share Price

Adani Energy Solutions Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्रोकरेज हाऊस व्हेंचुरा सिक्युरिटीजच्या तज्ञानी या कंपनीचे शेअर्स 60 टक्के वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ( अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड कंपनी अंश )

ब्रोकरेज फर्म वेंचुरा सिक्युरिटीच्या मते, पुढील 24 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 1600 रुपये किमतीवर जाऊ शकतात. शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स 0.51 टक्के वाढीसह 1,014 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

या वर्षीच्या जानेवारी महिन्यात अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीच्या शेअरने 1250 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. डिसेंबर महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 20 टक्के आणि नोव्हेंबर 2023 मध्ये 13 टक्क्यांनी वाढली होती. अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 686.90 रुपये होती. या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत शेअर 47 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.

व्हेंचुरा सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनी देशभरात 20,422 सर्किट किलोमीटर लांबीची ट्रान्समिशन लाइन आणि 54,600 MVA पॉवर ट्रान्सफॉर्मेशन क्षमता व्यवस्थापित करत आहे. TBCB-आधारित खाजगी वीज पारेषण मालमत्तेच्या बाबतीत अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीने एकूण बाजाराचा 35 टक्के वाटा काबीज केला आहे.

जानेवारी 2024 पर्यंत अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीकडे 37 ट्रान्समिशन मालमत्ता होत्या. भारत सरकार पुढील 10 वर्षांत पॉवर ट्रान्समिशन लाइनसाठी 10 लाख कोटी रुपयेच्या निविदा खुल्या करणार आहे. याचा फायदा अदानी ग्रुपच्या अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीला होणार आहे. व्हेंचुरा फर्मच्या मते, अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीचा महसूल संकलन 18.7 टक्के वाढून 7822 रुपये वर जाण्याची शक्यता आहे. तर एबिटा 19.70 टक्के वाढून 6619 कोटी होण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Energy Solutions Share Price NSE Live 23 March 2024.

हॅशटॅग्स

Adani Energy Solutions Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x