3 May 2025 11:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN
x

Bigg Boss Marathi | 'आजपासून माझ्याशी बोलू नको', निक्की आणि अभिजीतची तुटली मैत्री, पहा प्रोमो - Marathi News

Highlights:

  • Bigg Boss Marathi
  • भांडण करताना असं म्हणाली निक्की :
  • नेटकऱ्यांनी केल्यात मजेशीर कमेंट :
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घराने 50 हून अधिक दिवसांचा आकडा पार केला आहे. यामध्ये आतापर्यंत आठ सदस्यांनी बिग बॉसच्या घरात स्वतःला टिकवून ठेवलं आहे. दरम्यान मागील आठवड्यात महाराष्ट्राच्या धक्क्यावर अरबाज पटेल याने घराचा निरोप घेतला. त्यावेळी निक्की जीव तोडून रडत होती. कारण की, निक्कीची घरातील इतर सदस्यांपेक्षा अधिक घट्ट मैत्री फक्त अरबाज बरोबरच होती.

अरबाजूच्या जाण्याने निक्कीला फारच दुःख झालं होतं म्हणून अभिजीत तिला आधार देण्याचा प्रयत्न करत होता. परंतु आता या दोघांमध्ये देखील चांगलाच वाद झालेला पाहायला मिळतोय. आजच्या भागामध्ये दोघांची मैत्री तुटणार की काय असा प्रश्न प्रेक्षणाच्या मनात उपस्थित झालेला आहे. प्रोमोमध्ये स्पष्टपणे दिसतयं की, आज पासून अभिजीत आणि निक्कीमध्ये पूर्वीसारखी मैत्री पहायला मिळणार नाही.

त्यानंतर निक्की आणखीनच एकटी पडणार की काय असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. या दरम्यानचा निक्की आणि अभिजीतचा भांडण करतानाचा व्हिडिओ वायरल झाला आहे. हा व्हिडिओ आजच्या भागाचा प्रोमो आहे. त्यामुळे सर्व प्रेक्षक रात्री 9 वाजण्याची वाट पाहत आहेत.

भांडण करताना असं म्हणाली निक्की :

निक्की आणि अभिजीतमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. नेमकं काय प्रकार घडलाय हा आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. दरम्यान प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे निक्की अभिजीतला म्हणतीये की,”याचे फॅन्स उम्मीदमध्ये होते की अभिजीत बनेल कॅप्टन पण याने अंकिताला बनवलं”. तिच्या या वक्तव्यानंतर अभिजीत तिला उत्तर देत असे म्हणाला की,”आमच्यामध्ये लोकशाही आहे तुमच्यामध्ये डिक्टेटरशिप होती”. त्यानंतर निक्की म्हणते,” सटकवली तू माझी आता, खूप हाय हाय झाली आहे मी”. त्यानंतर अभिजीत म्हणतो,” तू गेम मध्येपण लोकांच्या भावनांचा खेळ केलाय”. त्यानंतर पुन्हा निक्की म्हणते की,”तुला मला वाईट दाखवायचं असेल हे सगळं करून तर माझ्याशी आजपासून बोलू नको”. अशा पद्धतीची बाचाबाची असणारा हा प्रोमो सोशल मीडियावर वायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

नेटकऱ्यांनी केल्यात मजेशीर कमेंट :

वायरल झालेल्या प्रोमोच्या व्हिडिओला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने अंकितासाठी अशी कमेंट केली आहे की, “अंकिता जळकी आहे सारखी अभिजीत आणि सुरजवर जळत राहते जळकुकडी”. तर दुसऱ्या युजरने अशी कमेंट केली आहे की,”अभिजीत आणि निक्की कितीही भांडण केले तरी शेवटी एकच होतात”.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi Nikki Tamboli angry on Abhijeet Sawant 24 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या