1 May 2025 10:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Bigg Boss Marathi | लेकीसाठी बाबाने पहिल्यांदाच गाठली मुंबई, अंकिताने बिग बॉसचे मानले आभार - Marathi News

Highlights:

  • Bigg Boss Marathi
  • अंकिताच्या वडिलांनी लेकीसाठी पहिल्यांदा गाठली मुंबई :
  • अभिजीतच्या लेकीला पाहून हे वाक्य म्हणाले बिग बॉस :
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | बिग बॉसचा पाचवा सीजन अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. दरम्यान बिग बॉस हा शो 70 दिवसांत बंद होणार अशा चर्चांना सोशल मीडियावर चांगलं उधान आलं होतं. प्रेक्षकांच्या सर्व प्रश्नांना बिग बॉस यांनी स्वतः उत्तर देऊन सर्व प्रश्नांना विरामचिन्ह दिलं आहे. यंदाचा बिग बॉस शो 100 नाही तर 70 दिवसांचाच असणार आहे.

दरम्यान सध्या बिग बॉसच्या घरात कौटुंबिक वातावरणाची उब तयार झालेली पाहायला मिळत आहे. बिग बॉस सर्वांना फ्रिज करून त्यांच्या कुटुंबीयांना घरामध्ये पाठवत आहेत. आजच्या भागात अंकिताचे कुटुंबीय तिला भेटायला येणार आहेत. यादरम्यानचा एक प्रोमो कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये अंकिता ढसाढसा रडून बिग बॉस यांचे हात जोडून आभार मानत आहेत.

अंकिताच्या वडिलांनी लेकीसाठी पहिल्यांदा गाठली मुंबई :

वायरल झालेला प्रोमोमध्ये अंकिता फ्रिज असते. त्यानंतर दरवाजा उघडून तिच्या दोन लहान बहिणी तिला भेटायला येतात. अंकितासह तिच्या दोन बहिणीही प्रचंड भावुक होतात. तिघीजणी एकमेकींना घट्ट मिठी मारून रडू लागतात. तितक्यातच अंकिताचे वडील घरामध्ये एन्ट्री करतात. वडिलांना पाहून अंकिता हक्की-बक्की होते. तिचा चेहऱ्यावरचा रंग उडाल्यासारखा दिसतो. त्यानंतर तिला रडू अनावर होतं आणि वडिलांना घट्ट मिठी मारून अंकिता रडू लागते. त्याचबरोबर अंकिता म्हणते की,”थँक्यू सो मच बिग बॉस तुम्ही माझ्या बाबांना पहिल्यांदा मुंबईत आणलय”. अंकिताच्या कुटुंबीयांची ओळख आज आपल्याला नऊ वाजता पाहायला मिळणार आहे. प्रोमो पाहून प्रेक्षक एपिसोड सुरू होण्याची वाट पाहत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

अभिजीतच्या लेकीला पाहून हे वाक्य म्हणाले बिग बॉस :

कालच्या भागात कुटुंबीयांपैकी सर्वातआधी वर्षा उसगावकर यांची बहीण घरामध्ये एन्ट्री करते. त्यानंतर अभिजीतची पत्नी आणि त्याच्या दोन मुली घरामध्ये एन्ट्री करतात. पत्नी आणि दोन गोंडस मुलींना पाहून अभिजीत सावंतला अश्रू अनावर होतात. त्याच्या दोन्ही मुली फारच गोड आहेत. सर्व सदस्यांना रिलीज केल्यानंतर अभिजीतची पत्नी सर्व सदस्यांची विचारपूस करताना दिसली. त्यानंतर सर्व सदस्य अभिजीतच्या दोन मुलींबरोबर गप्पा मारू लागले.

तेव्हा बिग बॉस म्हणाले की, घरासाठी एक नवीन वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळाली. ते असं अभिजीतच्या लहान मुलीला मस्करीत म्हणाले. तर, अशाप्रकारे बिग बॉसच्या घरात सध्या भावनिक आणि कौटुंबिक वातावरण झाल्याचं पाहायला मिळतय. अजून बऱ्याच सदस्यांचे कुटुंबीय घरात येण्याचे बाकी आहेत. प्रत्येकजण आपल्या घरच्यांची वाट पाहत बसले आहेत.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi season 5 Ankita Prabhu Walawalkar meet her father and sisters 27 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या