1 May 2025 12:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Devara Movie on Box Office | देवराने पार केली डबल सेंचुरी, प्रेक्षकांची तुफान गर्दी, हॉलिडेमुळे बंपर कमाई - Marathi News

Highlights:

  • Devara Movie on Box Office
  • देवराने गाठली डबल सेंचुरी :
  • देवराची ओव्हरसीज मधील कमाई :
Devara Box Office Collection

Devara Movie on Box Office | कोरतला शिवा दिग्दर्शित आणि जूनियर एनटीआर अभिनीत ‘देवरा पार्ट 1’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी छप्पर फाड कमाई केली होती. हा चित्रपट 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला असून आजपर्यंत चित्रपटाने सहा दिवस पूर्ण केले आहेत.

पहिल्याच दिवशी 172 करोड रुपयांची कमाई करून देवराने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला कमवला. त्यानंतर देवराने या 6 दिवसांमध्ये घरगुती बॉक्स ऑफिस म्हणजेच, नेटफ्लिक्स सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील चांगलीच कमाई केलेली आहे. चला तर पाहूया देवराच्या 6 दिवसांचं घरगुती बॉक्स ऑफिस कलेक्शन.

देवराने गाठली डबल सेंचुरी :
रिपोर्टनुसार देवराने आतापर्यंत 20.5 करोडोंचा खिसा भरला आहे. त्याचबरोबर सलग पाच दिवसांपर्यंत देवराने 14 करोड रुपयांची कमाई केली म्हणजेच एकूण कमाई 46.43 टक्क्यांने वाढली आहे. दरम्यान 2 ऑक्टोबरला नॅशनल हॉलिडे असल्याकारणाने देवराने घरगुती बॉक्स ऑफिसवर चांगलाच जोर धरला. यामध्ये देवराने 208.01 करोडोंचा आकडा गाठला आहे. देवराडे सात दिवसांपर्यंत म्हणजेच 3 ऑक्टोंबरपर्यंत 14 करोडपेक्षा जास्त रुपयांची कमाई केली आहे.

देवराची ओव्हरसीज मधील कमाई :
देवराने नॉर्थ अमेरिकेमध्ये ग्रॉल 5.3 मिलियनचा आकडा गाठला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, न्युझीलँड आणि फीझीमध्ये 850 हजार डॉलरपेक्षा जास्त कमाई केली आहे. देवरा पार्ट 1 या चित्रपटात जूनियर एनटीआर, जानवी कपूर आणि सैफ अली खान हे तीन कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. मराठी चित्रपट पाहून समजतंय की, देवरा पार्ट 1 या चित्रपटात अभिनेता जुनियर एनटीआर याने डबल रोल केला आहे.

त्याचबरोबर हा चित्रपट केवळ हिंदी आणि तमिळ नाही तर, आणखीन वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रत्येक भाषेतील आणि प्रवर्गातील व्यक्तीला हा चित्रपट पाहता यावा यासाठी नेटफ्लिक्स आणि ओटीटी विश्व सज्ज आहे. देवराने केवळ 6 दिवसांमध्ये कैक कोटींचा आकडा गाठला आहे. तर, येत्या फेस्टिवल सीजनमध्ये देवरा आणखीन किती करोडोंची कमाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Latest Marathi News | Devara Movie on Box Office 03 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devara Box Office Collection(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या