Samvardhana Motherson Share Price | 53 पैशाच्या शेअरची कमाल, रु.10000 गुंतवणुकीवर दिला 3 कोटी रुपये परतावा - Marathi News
Highlights:
- Samvardhana Motherson Share Price – NSE: MOTHERSON – संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनी अंश
- गुंतवणुकीवर परतावा
- कंपनीचा बोनस शेअर्स इतिहास

Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 24 वर्षात संवर्धन मदरसन कंपनीचे (NSE: MOTHERSON) शेअर्स 53 पैशांवरून वाढून 210 रुपये किमतीवर पोहचले आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 24 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 10000 रुपये गुंतवणूक केली होती त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 3 कोटींपेक्षा जास्त झाले आहे. (संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनी अंश)
मागील 24 वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 5 वेळा बोनस शेअर्स वाटप केले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना दीर्घकाळात प्रचंड नफा मिळाला आहे. आज गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 3.32 टक्के घसरणीसह 203.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गुंतवणुकीवर परतावा
6 ऑक्टोबर 2000 रोजी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 53 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही त्यावेळी संवर्धन मदरसन कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये गुंतवणूक केली असती तर तुम्हाला 18,866 शेअर्स मिळाले असते. या कंपनीने 2000 पासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना एकूण 5 वेळा मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहे. जर आपल्या गुंतवणुकीत बोनस शेअर्स जोडले तर एकूण शेअर्सची संख्या 143,253 होते. 1 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 210.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर सुरुवातीपासून आतापर्यंत होल्ड केले आहेत, त्यांच्या 143,253 शेअर्सचे सध्याचे मूल्य 3.01 कोटी रुपये झाले आहे.
कंपनीचा बोनस शेअर्स इतिहास
संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीने नोव्हेंबर 2000 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 1:2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. तर ऑक्टोबर 2012 मध्ये कंपनीने पुन्हा 1:2 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. त्यानंतर डिसेंबर 2013 आणि जुलै 2017 मध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1:2 प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. ऑक्टोबर 2022 मध्ये कंपनीने 1:2 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. ऑटो पार्टस आणि उपकरण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उचांक किंमत पातळी 217 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 86.80 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Samvardhana Motherson Share Price 03 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, या टार्गेट प्राईसवर एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA
-
BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS