5 May 2025 4:53 PM
अँप डाउनलोड

८ तारीख रात्री ८ वाजता नोटबंदी केली; अर्थव्यवस्था आज त्याची किंमत मोजत आहे; मोदी आज देशाला संबोधित करणार

PM Narendra Modi, Prime Minister Narendra Modi, Article 370, Jammu Kashmir

नवी दिल्ली : कलम ३५- ए आणि ३७० वरून गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील भारत आणि पाकिस्तानमधील वातावरण तापत चाललं आहे. अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता काश्मीरमध्ये वेगानं घडामोडी घडत आहेत. काश्मीरमधील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभेत जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याची शिफारस केली. या शिफारशीला राष्ट्रपतींनीही मान्यता दिली. त्यानंतर देशाच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला.

जम्मू व काश्मीरमध्ये मंत्रिमंडळ असेल परंतु या कायद्याला केंद्रशासित राज्याचा दर्जा असेल तर लडाख हा मंत्रिमंडळ नसलेला केंद्रशासित प्रदेश असेल असा प्रस्ताव अमित शाह यांनी राज्य सभेत मांडला होता. यामुळे काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्यात आले. या तरतुदीमुळे जम्मू व काश्मीरचा दर्जा अन्य राज्यांप्रमाणेच होणार आहे.

पंतप्रधाननरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. याबाबत पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरुन अधिकृतपणे माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मोदी काय बोलणार याची उत्सुकता देशवासियांना लागली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा ८ चा योग जुळून आला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या