नागपूर : आरएसएस’चे प्रमुख मोहन भागवत यांनी केंद्र सरकार संबंधित मोठं राजकीय विधान केले आहे. त्यांनी एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना थेट संघ सरकारमध्ये हस्तक्षेप करते, मात्र का करते याचे देखील कारण मोहन भागवत यांनी सांगितले आहे. ते नागपूरमधील एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान यावेळी त्यांनी इतरही अनेक विषयांवरून सार्वजनिकरित्या भाष्य केले.

यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी विधान केलं की, ‘सत्तेत आपल्या विचारांचे लोक आहेत. मात्र ते एका विशिष्ट तंत्रात आहे. त्यांच्या मनात योग्य विचार असून देखील त्यांनी केलेली सर्व कामं योग्य असतीलच असं नाही. देशातील सरकारी धोरणात आम्ही हस्तक्षेप करतो, मात्र तो हस्तक्षेप देशातील समाज हितासाठी आहे. संघाचा प्रभाव दाखवण्यासाठी नाही असं देखील पुढे बोलताना स्पष्ट केलं.

तसेच पुढे लघु उद्योगांविषयी बोलताना ‘देशातील उद्योगपतींमध्ये देशाची संस्कृती आहे, म्हणून ते दान करतात. संविधानामुळे राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य येईल, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. जगातील सर्व संपत्ती काही मोठ्या लोकांकडे आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या आधी कंपन्या नव्हत्या, मात्र उद्योग सुरु होते. आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वावलंबनाची गरजेचं आहे असंही विधान केले. दरम्यान, आरएसएस’च्या नियमांविषयी बोलताना ‘संघ हा नियमांनुसार चालतो. इथे शिस्त आहे. मी सरसंघचालक नसणार तेव्हा संघाचा सर्वसामान्य स्वयंसेवक असेल असंही मोहन भागवत यांनी सांगितलं.

सत्तेत आपल्या विचाराचे लोक आहेत; आम्ही सरकारी धोरणात हस्तक्षेप करतो, पण……