18 May 2024 6:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

वेळेवर निर्णय घेतल्यामुळे भारतात कोरोनाचा प्रसार मर्यादित ठेवण्यात यश - पंतप्रधान

India, Covid 19 spread

नवी दिल्ली, १६ जून: आपण कोरोनाच्या प्रादुर्भावाला जितक्या लवकर आळा घालू तेवढ्या लवकर आपल्याला अर्थव्यवस्था रुळावर आणता येईल. कोरोनाला लवकर रोखले तर बाजार, कार्यालये आणि वाहतुकीची साधने सुरु करता येतील. त्यामुळे पुन्हा रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदींनी मंगळवारी २१ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या बैठकीत त्यांनी म्हटले की, आपण वेळेवर निर्णय घेतल्यामुळे भारतात कोरोनाचा प्रसार मर्यादित ठेवण्यात यश आले.

आता अनलॉक-१ होऊनही दोन आठवडे उलटले आहेत. या काळात आपल्याला आलेले अनुभव भविष्यात उपयोगी ठरतील. आज मला तुमच्याकडून जमिनीवरील प्रत्यक्ष परिस्थिती समजली. तुम्ही दिलेल्या सूचना पुढील रणनीती ठरवण्यासाठी उपयोगी पडतील, असे नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

देशातील अनेक राज्यांमध्ये शेती, बागबागायती आणि एमएसएमई हा अर्थव्यवस्थेचा मोठा भाग आहे. आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत या क्षेत्रांसाठी उपायांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या क्षेत्रांना फायदा होईल. तसेच उद्योगांना वेगाने क्रेडिट मिळेल, त्यामुळे लोकांना रोजगार मिळेल, असे मोदींनी सांगितले.

दरम्यान, पूर्वोत्तर राज्ये आणि आदिवासी भागांमध्ये ऑर्गेनिक शेती करण्याची खूप संधी आहे. त्यासाठी प्रत्येक ब्लॉक आणि जिल्ह्यामधील खास उत्पादनांचा शोध घेतला पाहिजे. आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत ज्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्या एका निश्चित कालमर्यादेमध्ये प्रत्यक्षात उतरवल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे, असे मोदींनी सांगितले.

 

News English Summary: The sooner we curb the outbreak of corona, the sooner we can get the economy back on track. If the corona is stopped early, markets, offices and means of transportation can be started. Modi interacted with Chief Ministers of 21 states on Tuesday. “Because of our timely decision, we have been able to limit the spread of corona in India,” he said at the meeting.

News English Title: Timely decision we have been able to limit the spread of corona in India News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x