20 April 2024 12:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा Gold Rate Today | बोंबला! आजही सोन्याचा भाव मजबूत उसळला, तुमच्या शहरातील कॅरेट प्रमाणे नवे दर तपासून घ्या
x

मी तिथे होती, दिल्ली विद्यापीठात घोषणाबाजीवेळी कन्हैय्या कुमार तेथे नव्हता: भाजप खासदाराची पत्नी

sonam wangmo, ladakh MP Jamyang Tsering Namgyal, BJP, kanhaiya kumars

नवी दिल्ली: आपल्या एकाच भाषणानंतर देशभर प्रसिद्धीस आलेले लदाखचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांच्या पत्नीने कन्हैय्याकुमार यास क्लिनचीट दिली आहे. खासदार जामयांग यांच्या पत्नीही दिल्ली विद्यापीठाच्या माजी विद्यार्थीनी आहेत. विशेष म्हणजे, ज्यावेळी दिल्ली विद्यापीठात घोषणाबाजीचा प्रकार घडला. त्यावेळी, त्या विद्यापीठातच होत्या. तर, कन्हैय्या कुमार तेथे उपस्थित नव्हता. केवळ, विद्यार्थी संघटनेचा नेता असल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. जे घडलं ते चुकीचं घडलं, असं जामयांग यांच्या पत्नीनं म्हटलं आहे.

कन्हैय्या कुमारसोबत चुकीचं घडलं, तसेच उमर खालिद यांच्याही बाबतीत चुकीचं घडलं आहे. तेव्हापासून त्यांची प्रतिमा खराब बनली असून लोक त्यांना नावं ठेवतात. माझा एक भाऊही जो, जनावरांचा डॉक्टर आहे, तोही न्यूज चॅनेल्सवर कन्हैय्या कुमारला पाहिल्यानंतर त्याला दोषी मानतो, सर्वसामान्य जनतेला जे दाखवलं ते चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आलं, असे खासदार जामयांग यांच्या पत्नीने एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले. म्हणजेच, एकप्रकारे जामयांग यांच्या पत्नीने कन्हैय्या कुमारला क्लीनचीट दिली आहे.

तसेच जामयांग यांच्या पत्नी जवाहरलाल नेहरु विद्यापाठीतील उच्चशिक्षित असून त्यांची विचारसरणी ही डावी असल्याचं ते सांगतात. मात्र, घरात राहताना कौटुंबिक विचारधाराच महत्त्वाची असते, असेही त्या म्हणतात. विशेष म्हणजे, आता बाहेर माझ्या पतीचा आवाज चालतो, ते लोकांना सांगतात, सुनने की क्षमता रखो. पण, घरात मीच त्यांना तो डायलॉग मारते की, सुनने की क्षमता रखो…. असेही हसत हसत त्यांनी म्हटलं.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्र कोर्टाने फेटाळून लावले होते. याप्रकरणी न्यायालयाने दिल्ली पोलिसांची चांगलीच कानउघाडणीही केली होती. आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी दिल्ली सरकारची परवानगी का घेतली नाही, असा सवाल कोर्टाने पोलिसांना केला होता. ‘राज्याच्या कायदा विभागाकडून परवानगी न घेता तुम्ही आरोपपत्र दाखल केलेच कसे?’ अशी विचारणा शहर दंडाधिकारी दीपक राजावत यांनी केली होती.

दिल्ली पोलिसांनी कन्हैयासह उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य, आकिब हुसैन, मुजीब हुसैन, मुनीब हुसैन, उमर गुल, रईस रसूल, बशरत अली आणि खालिद बशीर भट यांच्या विरोधात १२०० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. संसद हल्लाप्रकरणी फाशीची शिक्षा देण्यात आलेला दहशतवादी अफझल गुरू याच्या समर्थनार्थ ९ फेब्रुवारी २०१६ रोजी जेएनयूत एका कार्यक्रमाचं आयोजन करून देशद्रोही स्वरूपाच्या घोषणा देण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी त्यावेळी आपली चूक मान्य करत ‘आप’ सरकारची परवानगी घेणार असल्याचं दंडाधिकाऱ्यांना सांगितलं होतं. सोबतच यासाठी कोर्टाकडून १० दिवसांची मुदत मागून घेतली होती .

दरम्यान, काही महिन्यापूर्वी कन्हैय्या कुमार एका व्हिडिओत मुस्लिम धर्माबद्दल बोलत असून त्याने मुस्लिम धर्म स्विकारला असल्याचा दावा काही फेसबुक पेज, ट्विटर हॅण्डलद्वारे खोटे करण्यात आले होते. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा कन्हैय्या कुमारबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र चौकशीत कन्हैय्या कुमारने कधीही आपण मुस्लिम धर्म स्वीकारला अथवा धर्मांतरण केले असल्याचे म्हटले नसल्याचे सत्य समोर आलं होतं. तो व्हिडिओ एका मोठ्या व्हिडिओचा एक छोटासा एडिट केलेला भाग होता. आणि तोच एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. असेच प्रकार जेएनयू’मधील घोषणाबाजीत देखील घडले होते. त्यावेळी देखील त्याला राष्ट्रदोही ठरवण्यासाठी खोटे एडिट केलेलं व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आले होते.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x