5 May 2025 5:03 PM
अँप डाउनलोड

मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी गाजावाजा; मोदी सत्तेत येण्यापूर्वी इस्रोच्या मोहीम झाल्या नाहीत का?

Economic Disaster, Chandrayan 2, PM Narendra Modi, CM Mamta banerjee

कोलकत्ता : इस्रोचा विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटल्यानं चांद्रयान मोहिमेला धक्का बसला. जवळपास संपूर्ण मोहीम अगदी सुरळीत सुरू असताना अखेरच्या दोन मिनिटांमध्ये इस्रोच्या हाती निराशा आली. यानंतर भावूक झालेल्या इस्रो प्रमुख के. सिवन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धीर दिला.

भारतीय चांद्रयान-२ चे विक्रम हे लँडर शनिवारी पहाटे १ वाजून ५५ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्याच्या बेतात असतानाच ऑर्बिटरचा आणि लँडरचा संपर्क तुटला. लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटरपर्यंत पोहोचले, तोपर्यंत त्याचा नियोजित दिशेनं प्रवास सुरळीत सुरू होता. त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. त्यामुळे लँडरची दिशा आणि ठिकाण कळण्यात अडचणी निर्माण झाल्या. तथापि, पर्यायी योजनेच्या माध्यमातून आकडेवारी मिळविण्यासाठी शास्त्रज्ञ कसोशीने कामाला लागले होते. इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी सांगितले की, प्राप्त आकडेवारीचे विश्लेषण करण्यात येत आहे.

दरम्यान, इस्रोने यापूर्वी अनेक यशस्वी आणि अयशस्वी मोहीम केल्या आहेत आणि त्यावेळी देखील भारत सरकार वैज्ञानिकांच्या पाठीशी ठामपणे उभं होतं. तत्पूर्वी ज्यादिवशी चांद्रयान २ च्या यानाने अवकाशात यशस्वी झेप घेतली होती, त्यानंतर मोदी सरकारने त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांच्या पगारात कपात केल्याची वृत्त देखील प्रसिद्ध झाली होती. वास्तविक देशाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. बेरोजगारी आणि महागाईने देशातील जनतेला भेडसावून सोडले आहे. त्यामुळे देशातील नागरिकांचे आर्थिक संकटाच्या मुद्द्यावरून चित्त विचलित करण्यासाठीचं चांद्रयान-२ मोहीमेचा गाजावाजा केला जात आहे, असा गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहेत.

शुक्रवारी पश्चिम बंगालच्या विधानसभेत राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) कायद्याविरोधात मांडण्यात आलेल्या विधेयकावरील चर्चेत बोलत होत्या. यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, देशात पहिल्यांदाच चंद्रयान मोहीम पार पडत आहे का? भारतीय जनता पक्ष सत्तेत येण्यापूर्वी अशी कोणतीच मोहीम झाली नव्हती का? देशातील आर्थिक संकटाच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच चांद्रयान-२ मोहीमेचा गाजावाजा केला जात आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या