4 May 2024 11:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन

Viji Khote, Sholey Movie, Sholey Movie Kaliya, Kaliya, Bollywood, Marathi Movie, Marathi Actors

मुंबई: ‘शोले’ चित्रपटातील ‘कालिया’ ही व्यक्तीरेखा गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील गायदेवी येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर ठरलेल्या शोले चित्रपटातील ‘सरदार, मैंने आपका नमक खाया है’; या संवादामुळे विजू खोटे यांना वेगळी ओळख मिळाली होती.

विजू खोटे यांनी हिंदी आणि मराठी भाषेतील ३००हून अधिक चित्रपटात काम केले होते. विजू यांच्या निधनामुळे एक हरहुन्नरी विनोदी अभिनेता हरपला अशी भावना चित्रपट क्षेत्रातून व्यक्त होत आहे. मराठीमधील अशी ही ‘बनवाबनवी’, ‘आयत्या बिळावर नागोबा’, ‘या मालक’ या चित्रपटांमधील त्यांची भूमिका गाजली होती.

अभिनेते विजय खोटे यांनी आपल्या चतुरस्त्र अभिनयाने हिंदी-मराठी सिनेमा सृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली होती. मराठी रंगभूमीबरोबर त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात दमदार भूमिका केल्या. भारतीय सिने इतिहासात विशेष नोंद केल्या गेलेल्या शोले सिनेमातील कालियाची भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायमची कोरली गेली. शोलेतील गब्बर जेव्हा अबे ओ कालिया, तेरा क्या होगा?, असे विचारतो तेव्हा कालिया घाबरत उत्तर देतो, ‘कु..कु..छ नही सरकार, मैने तो आपका नमक खाया हैं’ हा संवाद अंत्यंत गाजला. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाची चर्चा होते, तेव्हा कालियाचं पात्र हमखास चर्चेत येतं.

हॅशटॅग्स

#BollywoodMovie(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x