14 May 2025 3:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | 22 टक्के तेजीचे संकेत, पीएसयू शेअर्सची जोरदार खरेदी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC Yes Bank Share Price | येस बँक शेअर्ससाठी SELL रेटिंग, पेनी स्टॉकबाबत तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत - NSE: YESBANK HFCL Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार या स्वस्त शेअरवर, रिलायन्स ग्रुपचीही हिस्सेदारी, टार्गेट नोट करा - NSE: HFCL Tata Steel Share Price | ग्लोबल नुवामा फर्मकडून BUY रेटिंग, टाटा स्टील शेअर टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATASTEEL Tata Motors Share Price | बोफा सिक्युरिटीज बुलिश, टार्गेट प्राईस वाढवली, फायद्याची अपडेट आली - NSE: TATAMOTORS JP Power Share Price | पॉवर कंपनी पेनी स्टॉकमध्ये तेजी, तुमची खरेदी केला? यापूर्वी 1442% परतावा दिला - NSE: JPPOWER IRB Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये 2.84% तेजी; पुढे रॉकेट तेजीचे संकेत; संधी सोडू नका - NSE: IRB
x

पीएमसी बँक खातेधारकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; सर्व कैफियत मांडली

MNS Chief Raj Thackeray, Krushnakunj, PMC Bank, PMC Bank Fraud, PMC Bank Scam, RBI, HDIL

मुंबई: आर्थिक गैरव्यवहारामुळं निर्बंध लादण्यात आलेली पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदारांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. खातेदारांनी आपापल्या अडचणींचा पाढा राज यांच्यापुढं वाचला आणि मदतीची विनंती केली. खातेदारांच्या समस्यांबाबत आवाज उठविण्याचं व निवडणूक प्रचारातील प्रत्येक भाषणात या घोटाळ्यावर बोलण्याचं आश्वासन राज यांनी यावेळी दिलं.

पीएमसी बँक घोटाळा समोर आल्यानंतर त्यावर आरबीआयने काही निर्बंध लादले आहेत. त्यानंतर खातेधारकांचा राग उफाळून आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मुंबईत आल्या असता त्यांच्यासमोर निदर्शने केली. घोषणाबाजी करत त्यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवला. तर काल, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यान खातेधारकांनी त्यांना काळे झेंडे दाखवली.

राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे व मनसेचे नेते बाळा नांदगावकर यावेळी उपस्थित होते. राज यांनी शांतपणे खातेदारांचे म्हणणे ऐकून घेतले. तसंच, त्यांना या प्रश्नी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं. खातेदारांच्या भेटीनंतर शर्मिला ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या