6 May 2025 4:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS RVNL Share Price | झटपट मोठी कमाई होईल, पीएसयू शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL BHEL Share Price | या मल्टिबॅगर पीएसयू शेअरला तज्ज्ञांनी दिली BUY रेटिंग, मिळेल इतका मोठा परतावा - NSE: BHEL
x

महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या विषयांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपचा काश्मीर केंद्रित प्रचार?

Maharashtra Vidhansabha Election 2019, Jammu Kashmir Election

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात आज पहिली सभा झाली आहे. जळगाव तसंच भंडारा जिल्ह्यातील नाना पटोले यांच्या बालेकिल्ल्यात साकोली विधानसभेत मोदींच्या पहिल्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून विरोधकांवर जोरदार टीका करण्यात आली. तर यावेळी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात काम करणाऱ्यांना निवडून द्या असं आवाहनही मोदींनी यावेळी जनतेला केलं. दरम्यान, याहीवेळेस मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली.

जम्मू काश्मीरमधील लोकांच्या विरुद्ध भावना काँग्रेस-राष्ट्रवादीची दिसून येते. शेजारील राष्ट्रांना मदत होईल असे वक्तव्य करतात. त्यामुळे तुमच्यात हिंमत असेल तर आगामी निवडणुकीत विरोधकांनी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० परत आणू असं घोषणापत्रात देणार का? उगाच खोटे अश्रू काढू नका असं आव्हान नरेंद्र मोदींनी विरोधकांना केलं.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, जळगावात अभूतपूर्व सभा झाली. पुढील ५ वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार यावं यासाठी मी जळगावात आलो आहे. तुम्ही जो विश्वास भारतीय जनता पक्षावर, एनडीएवर दाखविला त्याचे आभार मानण्यासाठी मी इथे आलो आहे. चार महिन्यांपूर्वी तुम्ही समर्थ, सशक्त भारताच्या निर्माणासाठी मतदान केलं होतं. जगात भारताला स्थान मिळावं यासाठी तुम्ही मतदान केलं. नव्या भारताचा नवा जोश जगाला दिसू लागला आहे. तुम्हाला हे दिसतंय ना,असं जनतेला विचारले. पूर्वी असं चित्र पाहायला मिळालं होतं का? असा सवाल त्यांनी उपस्थित लोकांना विचारला. केवळ मोदी मूळे हे होत नाही, १३० कोटी भारतीय जनतेने केलेल्या सहकार्य यामुळे शक्य झाले.

असं असलं तरी संपूर्ण भाषणात मोदींनी बेरोजगारी, ढसाळणारी अर्थव्यवस्था, शेतकरी आत्महत्या आणि महिलांसंबंधित वाढत्या गुन्हेगारी अशा गंभीर विषयांना हात घातलाच नाही. संपूर्ण भाषण जम्मू काश्मीर, कलम ३७० आणि इतर पाकिस्तान संबंधित भावनिक मुद्दे मांडत मतदाराला पुन्हा भावनिक भुरळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला सरकार म्हणून खरंच बेरोजगारी, ढसाळणारी अर्थव्यवस्था, शेतकरी आत्महत्या आणि महिलांसंबंधित वाढत्या गुन्हेगारी अशा गंभीर विषयांबद्दल काहीच देणंघेणं नसल्याचं दिसत आहे.

अगदी बीडमधील अमित शहा यांच्या भाषणापासून केवळ भावनिक मुद्दे पुढे रेटले जाणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. तरुणांच्या, सामान्य मतदारांच्या, महिलांच्या आणि शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतेमंडळींनी कोणती गंध नसल्याचं दिसत असून , आज मोदींच्या भाषणात देखील स्पष्ट झालं आहे आणि त्यामुळे सामान्य मतदार आता काय निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आज बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा वरवट बकाल व खामगाव येथे आयोजित केली आहे. या सभेपूर्वी शेगाव तालुक्यातील खातखेड येथील राजू नामदेव तलवारे या युवकाने पुन्हा आणूया आपले सरकार हे टी-शर्ट घालून आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीस आली. जळगाव जामोद तालुक्यातील वरवट बकाल येथे काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होत आहे. यापूर्वीच खातखेड येथील या युवकाने आत्महत्या केली.

जळगाव जामोद इथून कामगार मंत्री डॉ संजय कुटे आमदार आहेत. शेगाव तालुक्यातील खातखेड इथं रविवारी सकाळी ११ वाजता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजू ज्ञानदेव तलवारे असं 35 वर्षीय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे त्याने आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी यवेल्यातही एका तरुण शेतकऱ्याने कर्जबारीपणामुळे आत्महत्या केली. त्यामुळे भर निवडणुकांमध्येही शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याने शेतकऱ्यांसाठी झालेल्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

  1. मी जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे
  2. फडणवीसांच्या नेतृत्वाला मद द्या
  3. जगभरात भारताचा गौरव होत आहे
  4. 4 महिन्यांपूर्वी दिलेल्या मताधिक्याबद्दल आभार
  5. संपूर्ण जगभरात भारताच्या लोकशाहीचा गौरव
  6. जनादेशामुळे भारताचा आवाज जगभरात ओळखला जातो.
  7. स्त्रीशक्तीचा जागर जगाने मानला
  8. 70 वर्षानंतर काश्मीरमधील नागरिकांना स्वातंत्र्य
  9. सीमेपलीकडे होणारा दहशवाद संपवला
  10. मोदींकडून कलम 370 आणि काश्मीरचा उल्लेख
  11. काश्मीर भारताचं मस्तक आहे.
  12. गेली 5 वर्ष जनतेचा युतीवर विश्वास आहे
  13. कलम 370 वर विरोधकांची भूमिका संशयास्पद
  14. हिंमत असेल तर घोषणापत्रात कलम 370बद्दल नमुद करा, विरोधकांना आव्हाहन
  15. मुल्सीम महिलांना मोठा दिलासा दिला
  16. तीन तलाक कायदा रद्द केला
  17. शरद पवारांवर मोदींची घणाघाती टीका
  18. शरद पवारांच्या व्हायरल व्हिडिओवर नरेंद्र मोदींची टीका
  19. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जनतेची दिशाभूल

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या