1 May 2024 4:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल Vesuvius Share Price | अल्पावधीत 400% परतावा देणाऱ्या शेअरची एकदिवसात 15% उसळी, खरेदीला ऑनलाईन गर्दी Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये ब्रेकआउट, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस जाहीर Birlasoft Share Price | मालामाल होण्याची संधी! 633% परतावा देणारा शेअर चर्चेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट आली Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा अपडेट, स्टॉक Hold करावा की Sell करावा?
x

जे माझ्या बारश्याला हजर होते ते आज माझ्याविरोधात उभे: उदयनराजे भोसले

PM Narendra Modi, Former MP Udayanraje Bhosale, Satara loksabha By Poll, Maharashtra Vidhansabha Election 2019

सातारा: उदयनराजें भाषणात बोलताना म्हणाले, खासदारकीचा राजीनामा देण्यासाठी हीच वेळ योग्य वाटली. मोदींसोबत जाण्याची मागणी समर्थकांनी केली म्हणून मी मोदींसोबत, जे माझ्या बारश्याला हजर होते ते आज माझ्याविरोधात उभे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पोलाद पुरुष आहेत असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं साताऱ्यात कौतुक केलं. कलम ३७० वरुन मोदींवर टीका केली जाते मात्र देशाचे जवान आपल्याला महत्त्वाचे नाहीत का? त्यामुळे कलम ३७० हटवलं आणि तो मुद्दा विधानसभा निवडणूक प्रचारात आणला तर बिघडलं काय? असंही उदयनराजे यांनी विचारलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साताऱ्यात जाहीर सभा सुरू आहे. तुळजा भवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून पंतप्रधान मोदींनी मराठी भाषेतून आपल्या भाषणाची सुरुवात केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची परिस्थिती बिकट आहे. जे लोक साताऱ्याला बालेकिल्ला समजत होते, ते लोकही लढायची आता हिंमत करत नाही. राष्ट्रवादीनं पृथ्वीराज चव्हाणांना उतरवण्याचा प्रयत्न केला, पण तेसुद्धा लढायला तयार नाहीत. शरद पवार हे शरद पवार आहेत, ते हवेची दिशा बरोबर ओळखतात, असं नरेन्द्र मोदी म्हणाले आहेत, ते साताऱ्यातील सभेला संबोधित करत होते.

साताऱ्याला आपला अभेद्य किल्ला मानणाऱ्यांना आज इथून माघार घ्यावी लागली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये भेद असल्याचे सांगत हे विकास काय करणार? अशा शब्दांत त्यांनी टीकाही केली. लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभेचे महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी मोदींनी गुरुवारी साताऱ्यात प्रचार सभा घेतली यावेळी ते बोलत होते. साताऱ्यात प्राचारासाठी येणारे मोदी हे पाचवे पंतप्रधान ठरले आहेत.

साताऱ्याचा दौरा आपल्यासाठी तीर्थयात्रा असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील अपशिंगे गावाचा आवर्जुन उल्लेख केला. ते म्हणाले, इथल्या अपशिंगे मिलिटरी गावाने राष्ट्रसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्याला राष्ट्रप्रेमाचा आणि त्यागाचा इतिहास आहे. त्यामुळेच जेव्हा विरोधक राफेल सारख्या आधुनिक लढाऊ विमानांचा अपप्रचार करतात, कलम ३७० हटवण्याला विरोध करतात, वीर सावरकरांना विरोध करतात तेव्हा साताऱ्याचा पारा चढलेला असतो. काँग्रेस-राष्ट्रवादी जनभावना कळतं नाही, यावेळी जनता त्यांना कडक शिक्षा देणार आहे.

हॅशटॅग्स

#Udayanraje Bhosale(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x