3 May 2025 3:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

आम्ही विरोधीपक्षाची भूमिका बजावणार: जयंत पाटील

NCP, MLA Jayant Patil, Sharad Pawar

मुंबई: राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच एनसीपीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “जनतेनं आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसण्याचा कौल दिला आहे. त्यामुळे आम्ही विरोधीपक्षाचीच भूमिका बजावणार असल्याचं” मत त्यांनी व्यक्त केलं. आज (बुधवार) एनसीपीचे सर्वेसर्वा शरद पवार, आमदार जयंत पाटील आणि आमदार नवाब मलिक यांची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

“एनसीपीमध्ये कोणतीही अंतर्गत स्पर्धा नाही. तसंच पक्षातील स्रव निर्णय शरद पवार हे पक्षातील सर्वांना विश्वासात घेऊनच घेत असतात. ते जो निर्णय घेतात तो अंतिम असतो,” असं गटनेतेपदाच्या नियुक्तीबाबत बोलताना पाटील म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. “पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. विरोधीपक्ष नेत्याबाबत शरद पवार हे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. त्यात कोणाच्याही इच्छुकतेचा प्रश्न उद्भवतो असं वाटत नाही, ” असंही त्यांनी नमूद केलं.

तत्पूर्वी, विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. पण मुख्यमंत्री पद आणि सत्तेतील ५०-५० च्या सूत्रावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद वाढतच चाललाय. यामुळे ५४ जागा जिंकलेल्या एनसीपीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ‘विधानसभेत भारतीय जनता पक्ष बहुमत सिद्ध करू शकला नाही आणि सरकार पडले तर एनसीपी पर्यायी सरकार स्थापन करण्याचा विचार करेल’, असं नवाब मलिक म्हणालेत. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सत्ता स्थापनेबाबत हे वक्तव्य केलं होतं.

निवडणुकीच्या निकालात १०५ जागा जिंकून भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विरोधीपक्षात बसण्याची आमची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन करावी. पण विधिमंडळात बहुमत सिद्ध करताना शिवसेनेने भारतीय जनता पक्षविरोधी भूमिका घेतली आणि सरकार पडले तर पर्यायी सरकारचा विचार एनसीपी करेल, असं नवाब मलिक म्हणाले होते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या