7 May 2024 1:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

पवारांनी शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेटी देताच 'डिजिटल' सत्ताधारी जमिनीवर

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Sharad Pawar

मुंबई: राज्यातील शेतकर्‍यांचे अवकाळी पावसाने झालेले नुकसान आणि राज्य सरकारच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना याचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. राज्याचे मुख्य सचिव, कृषी, मदत-पुनर्वसन, वित्त आणि विविध विभागांचे सचिव, भारतीय हवामान विभाग आणि विमा कंपन्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने उपस्थित होते. सुमारे ३२५ तालुक्यांमध्ये ५४,२२,००० हेक्टरवर पीकं बाधित झाली आहेत. ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिकं यामुळे बाधित झाली आहेत. प्रभावित भागाचे तत्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले होते. मात्र राज्यातील शेतकरी संकटात असताना भाजप आणि शिवसेनेचे नेते राजकीय सौदेबाजीत व्यस्त होते. मात्र शरद पवार त्याला अपवाद ठरले आणि त्यांनी सर्व राजकीय घटनाक्रमकडे दुर्लक्ष करत राज्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर प्रसार माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर टीका होताच भाजप सेनेचे नेते दौऱ्यावर निघाले आहेत. त्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत तर फडणवीस देखील पाहणी दौऱ्यावर निघाले आहेत.

तत्पूर्वी राज्यातील सत्ता स्थापनेवरून भारतीय जनता पक्ष-शिवसेनेत वाद सुरू असताना दुसरीकडे शरद पवार हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले होते. शरद पवार शुक्रवारी अकरा वाजेच्या सुमारास नाशिकमध्ये दाखल झाले होते. इगतपुरीमधील भात पिकाच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांचं नुकसान आणि त्यांच्या व्याथा त्यांनी जाणून घेतल्या होत्या. आमच्या हातचं पीक गेलंय. खूप नुकसान झालंय. जगावं की मरावं असा प्रश्न आमच्या समोर आहे. मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही, असं शेतकऱ्यांनी पवारांना सांगितलं.

पवार यांनी दवंगे या शेतकऱ्यांकडून किती द्राक्ष बाग आहे, कधी छाटली, आता शिल्लक किती राहिली, पुढील वर्षासाठी कसे नियोजन करणार ही सर्व माहिती घेतली होती. उपस्थित सर्व शेतकऱ्यांना नैराश्य येऊ देऊ नका असा सल्ला दिला होता. पावसामुळे नाशिक जिल्ह्यात जवळ जवळ सगळ्याच भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामध्ये सर्वात मोठे नुकसान हे द्राक्ष उत्पादक शेतकरयांचे झाले आहे. द्राक्ष बागांसोबत हाता तोंडाशी आलेले मका, सोयाबीन, बाजरी आणि टोमॅटो या पिकांचे नुकसान झाले. सोंगलेले पीक आज पाण्यात भिजलेले पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x