3 May 2024 12:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | अशी संधी सोडू नका! IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
x

सत्ता आपल्या चुकीमुळे नाही तर शिवसेनेच्या गद्दारीमुळे गेली: खा. नारायण राणे

Chief Minister Uddhav Thackeray, BJP MP Narayan Rane

सावंतवाडी : स्वातंत्र्यानंतर झालेल्या फाळणी वेळी भारताच्या सीमावर्ती भागात आश्रय घेतलेल्या अत्याचारग्रस्त लोकांना भारताचे नागरिकत्व देण्याचे काम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारत देश धर्मनिरपेक्ष आहे, हे पटवून देणारे नागरिकता विधेयक दोन्ही सभागृहांत संमत झाले. मात्र, या वेळी शिवसेनेची भूमिका ही धरसोड राहिली. हिंदुत्ववादी म्हणविणा-या शिवसेनेचा खरा मुखवटा यावेळी उघड झाला, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांनी केली. खरे म्हणजे, शिवसेना हा मुखवटा नसलेला पक्ष आहे, असेही ते म्हणाले.

सावंतवाडी येथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना खा. नारायण राणे बोलत होते. केवळ सत्तेसाठी धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबर आघाडी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. प्रशासनाची व जनतेच्या प्रश्नांची कोणतीही जाण नसलेला, अबोल मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेला मिळाला, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांना प्रशासनाची कोणतीही जाण नाही. राज्याच्या व जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास नाही. त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत आणि विकासाला खीळ बसेल, असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. हिंदुत्ववादी आणि धर्मनिरपेक्ष अशा वेगवेगळ्या विचारधारा असणारे हे तिन्ही पक्ष असल्यामुळे त्यांचे परस्परांशी जास्त काळ पटणार नाही. तसेच काँग्रेसने जातीयवादी पक्षाशी हातमिळवणी केली आहे, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या अनेक नेत्यांना मान्य नाही. त्यामुळे हे तीन पक्ष जास्त काळ एकत्र राहू शकणार नाहीत आणि हे सरकार सहा महिन्यांत कोसळेल, असं नारायण राणे म्हणाले आहेत. राज्यातील सत्ता ही आपल्या चुकीमुळे नाही, तर मित्रपक्षांच्या गद्दारीमुळे गेली आहे. त्यामुळे भविष्यात स्वाभिमान व भाजप यांच्या एकत्रित येण्यामुळे वाढलेली ताकद एकदिलाने काम करून व पक्षाच्या ध्येय-धोरणानुसार निष्ठा व प्रामाणिकपणे काम करून जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका भाजपचेच कार्यकर्ते जिंकतील व भविष्यात आमदार-खासदार व पालकमंत्री हे भाजपचेच असतील, असा विश्वास खासदार राणे यांनी व्यक्त केला.

 

Web Title:  BJP MP narayan Rane criticized Chief Minister Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x