2 May 2025 3:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON
x

५-६ वर्षांपूर्वी देशाची अर्थव्यवस्था भयानक स्थितीत होती; आम्ही स्थिर केली: नरेंद्र मोदी

PM Narendra Modi, Indian Economy

नवी दिल्ली: देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत गदारोळ सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी दिल्लीत एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, देशासाठी काम करताना मोठ्या प्रमाणावर लोकांचा राग सहन करावा लागतो, तसेच बर्‍याच लोकांना असंतोष देखील सहन करावा लागतो आहे, याशिवाय अनेक आरोपांनाही तोंड द्यावं लागतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ASSOCHAM कार्यक्रमात अर्थव्यवस्था, जीएसटी आणि ‘इज ऑफ डोईंगच्या’ रँकिंगबद्दल मत व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ASSOCHAM कार्यक्रमात संबोधित करताना म्हटले की तुमच्या १०० वर्षाच्या प्रवासामध्ये बरेच चढ-उतार आले असतील आणि अनेकांनी ते अनुभवलं देखील ते सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत. तुमचा शंभर वर्षांचा प्रवासात तुम्ही भारताची स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्योत्तर पाहिलेले भारत अनुभवाला आहे.

पीएम मोदी म्हणाले की, २०२० वर्ष सर्वांसाठी आनंद आणि समृद्धी आणेल आणि याबद्दल तुमचे अभिनंदन करतो. ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेबद्दलचा विषय काही अचानक समोर आलेला नाही. कारण मागील ५ वर्षांत देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट झाली आहे, त्यामुळेच ते लक्ष गाठता येणं शक्य आहे. ५-६ वर्षांपूर्वी भारताची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट परिस्थितीतून जात होती, परंतु आमच्या सरकारने त्यात अनेक बदल करून ती स्थिर केली. मात्र काही दिवसांपासून विरोधी पक्ष केंद्र सरकारला वाईट अर्थव्यवस्थेसाठी जवाबदार धरत आहेत, असं देखील मोदी म्हणाले.

 

Web Title:  Five Six years back our economy was heading towards disaster, our Govt has not only stabilized says PM Narendra Modi.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या