29 April 2024 3:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

लांजा नगरपंचायत निवडणुकीत सुद्धा भाजपचा सुपडा साफ; शिवसेनेला स्पष्ट बहुमत

Shivsena, Lanja Nagar Panchayat

रत्नागिरी: लांजा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निकालामध्ये शिवसेनेने बाजी मारली असून यामध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष म्हणून मनोहर बाईत हे निवडून आले आहेत. तसेच शिवसेनेच्या ९ नगरसेवकांनी विजय मिळवला. लांजा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारत नगर पंचायतीत भगवा फडकवला. नगराध्यक्षपदी शिवसेनेचे मनोहर बाईत विजयी झाले असून नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळवलं. १७ नगरसेवकांपैंकी ९ नगरसेवक शिवसेनेचे विजयी झाले आहेत. तर भाजप ३, आघाडी १, अपक्ष ४ नगरसेवक विजयी झालेत.

या निवडणुकीत विद्यमान नगराध्यक्ष राजू कुरूप यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. तसेच ४ अपक्षांपैंकी २ अपक्ष हे शिवसेनेचे बंडखोर अपक्ष होते. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी आघाडी करूनदेखील म्हणावं तसं यश संपादन करू शकले नाहीत. आघाडीला फक्त एका जागेवरच समाधान मानावं लागलं तर भाजपचेदेखील ३ नगरसेवक या निवडणुकीत विजयी झाले आहेत. मागच्या वेळची शिवसेनेची काठावरची सत्ता होती मात्र यावेळी शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवत विजय संपादित केला आहे. लांज्यात शिवसेनेने जल्लोष करत फटक्यांची आतषबाजी केली.

तत्पूर्वी, राज्यातील सत्तेचं टॉनिक मिळताच शिवसेनेला उभारी आली असून त्याचे प्रतिबिंब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही दिसत आहे. जिल्हा परिषद निवडणुकांत यशाचा आलेख उंचावणाऱ्या शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीतही विजयाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे शिवसेनेचं पालिकेतील बळंही वाढलं आहे.

मुंबई महापालिकेतील मानखुर्द प्रभागातील पोटनिवडणुकीत शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला धक्का दिला आहे. शिवसेना उमेदवार विठ्ठल लोकरे प्रभाग क्रमांक १४१ मधून विजयी झाले. लोकरेंनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिनेश पांचाळ यांचा पराभव केला.

नाशिकमध्ये दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक २६ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे मधुकर जाधव विजयी झाले आहेत. इथं महाविकास आघाडी प्रयोग यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे शिवसेनेनं जागा राखली आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेचे उमेदवार मधुकर जाधव यांना पाठिंबा जाहीर केला होता. जाधव यांच्याविरोधात सेनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेलेले उमेदवार दिलीप दातीर हे उभे होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप दातीर यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तर या प्रभागात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. खान्देशी मतं ठरली निर्णायक ठरल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, या पोटनिवडणुकीत निच्चांकी मतदान झालं होतं. नाशिक महापालिका पोटनिवडणुकीत दोन्ही जागी भाजपचा पराभव झाला आहे. प्रभाग २६ मध्ये शिवसेनेचे मधुकर जाधव, २२ मध्ये महाविकास आघाडीचे जगदीश पवार विजयी झाले. जाधवांकडून मनसेचे दिलीप दातीर पराभूत झाले आहेत, मात्र भाजप थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याने ३ वर्षांपूर्वीची भाजपची लाट ओसरली आहे असंच म्हणावं लागेल.

 

Web Title:  Shivsena party got a clear majority in Lanja Nagar Panchayat Election in Ratnagiri District.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x