3 May 2025 8:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

रामदास आठवले पलटी मारण्याच्या तयारीत? पवारांसोबत राज्यसभा संदर्भात चर्चा?

BJP MP Ramdas Athawale, NCP President Sharad Pawar

मुंबई: राज्यसभेच्या आगामी निवडणुकीत केंद्रिय समाजकल्याण राज्यमंत्री आणि आरपीआय (ए) पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना भारतीय जनता पक्षाकडून संधी दिली जाणार नसल्याच्या बातम्या बुधवारी माध्यमांत झळकल्या. त्यानंतर आज आठवले यांच्या घरी एनसीपी’चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली.

२०१४ नंतरच्या काळात भारतीय जनता पक्षाने आठवलेंना केंद्रिय मंत्रीमंडळात संधी दिली. २०१९ च्या निवडणुकीनंतरही त्यांचे पद कायम ठेवले, पण आता त्यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपत आली आहे. त्यांच्या जागेसह महाराष्ट्रातील राज्यसभेच्या इतर जागांची निवडणूक मार्चअखेर लागणार आहे. यावेळी आठवलेंना भारतीय जनता पक्षात संधी देणार नाही, असे वृत्त आहे.

त्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाला धोबीपछाड दिल्याने भाजप देखील चिंतेत असल्याचं समजतं आणि त्यात विधानसभा निवडणुकीत मराठा राजकारण खेळून देखील प्रत्यक्ष उदयराजे देखील पराभूत झाल्याने फडणवीस पेचात सापडले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष उदयनराजे भोसले यांना संधी देणार तसेच स्वतः देवेंद्र फडणवीस यांना देखील ताकद देण्यासाठी दिल्लीत मंत्रिपद देऊन राज्यात सेनेविरुद्ध लढा उभा केला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यात देवेंद्र फडणवीस आणि माजी खासदार उदयनराजे ही नावं प्रथम क्रमांकाची असल्याने आठवले धास्तावल्याचे वृत्त आहे.

त्यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे यावेळी रामदास आठवलेंच्या पक्षाला जागा सोडण्याची भारतीय जनता पक्षाची मानसिकता नसल्याचं कळतं. त्यामुळे आठवलेंना इतक्या सहजासहजी राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही आणि ते भाजपसाठी फलदायी ठरत नसल्याची चर्चा भाजपात आहे . त्याचा परिणाम म्हणून रामदास आठवले यांच्या घरी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक झाली. भारतीय जनता पक्षाने फारच अडवणूक केली तर आठवले हे महाविकास आघाडीचा विचार करू शकतात, असा संदेश या भेटीतून देण्यात आला आहे.

तत्पूर्वी, रामदास आठवले मुर्ख आहेत. त्यांचा मुर्खपणा सगळ्या जगाला ठावूक आहे. तळवे चाटूनच त्यांनी पदं मिळवलीत, असे गंभीर आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी केले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम त्यांच्या नातवांमुळेच अडलं आहे, अशा आशयाचं विधान रामदास आठवले यांनी केलं होतं. त्यावर आनंदराज आंबेडकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.

आठवलेंनी इंदू मिलचं काम बघावं. कसं चाललं आहे, हे बघावं. त्यानंतर त्यांनी बोलावं. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हावं, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असंही आनंदराज आंबेडकर यांनी उत्तर दिलं होतं. रामदास आठवलेंना मी कधीही नेता मानलेलं नाही. जे सत्तेत येतील त्यांचे तळवे चाटण्या पलिकडे या माणसाने काहीही केलेलं नाही. त्यांना जे नेता समजतात ते मुर्खांच्या नंदनवनात जगतात, असंही आनंदराज आंबेडकर म्हणाले होते.

 

Web Title:  BJP MP Ramdas Athawale meet NCP President Sharad Pawar at Delhi.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या