29 April 2024 12:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

भाजपाचं फिल्मी प्रतिउत्तर? आमची छाती फाडली तरी रामच दिसेल: चंद्रकांतदादा

CM Uddhav Thackeray, Ayodhya Visit, BJP State President Chandrakant Patil

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. काँग्रेसशी युती करून शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली, या टीकेचा त्यांनी प्रतिवाद केला.

मी भाजपपासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. उद्धव ठाकरे संध्याकाळी ४ वाजता रामल्लाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होतील. रामलल्लाचे दर्शन घेण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे हे पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले, मी तिसऱ्यांदा अयोध्येत आलो होते. अयोध्येते येणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी वारंवार अयोध्येत येईन. नोव्हेंबरमध्ये अयोध्येला आलो आणि नोव्हेंबरमध्येच मी मुख्यमंत्री झालो. मी स्वप्नातही याचा विचार केला नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या आधी आलो होतो. त्यावेळी चांगले यश मिळाले होते. मी अयोध्येला नियमित येत राहणार आहे. मी प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद घेणार आहे.

मात्र भाजप म्हणजे हिंदूत्व नाही. शिवसेना भाजपपासून दूर गेलीय. हिंदुत्वापासून नाही, असं सांगणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. प्रभू रामचंद्राशी नातं असल्याचं दाखवण्यासाठी शिवसेनेला अयोध्येत जावं लागतं. पण, आमची छाती फाडली तरी तुम्हाला त्यात रामच दिसेल, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अयोध्येत जाऊन प्रभू रामाचं दर्शन घेतलं. ठाकरे यांच्या या दौऱ्यावर चंद्रकांत पाटील यांनी सडकून टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ९५ वर्षापूर्वीच हिंदू राष्ट्राची सांस्कृतिक संकल्पना मांडली आहे. आमचा हा सांस्कृतिक राष्ट्रवाद उद्धव ठाकरे यांना आधीपासूनच मान्य होता. आता तो जर काँग्रेसलाही मान्य झाला असेल तर आनंदच आहे, असा चिमटा चंद्रकांत पाटील यांनी काढला.

 

News English Summery: BJP is not Hindutva. Shiv Sena has moved away from BJP. BJP state president Chandrakant Patil has rebelled against Chief Minister Uddhav Thackeray saying that he is not from Hindutva. Shiv Sena had to go to Ayodhya to show that it had a relationship with Lord Rama Chandra. But, even if our chest is torn up, you will see it right in the words, Chandrakant Patil has criticized Shiv Sena. Chief Minister Uddhav Thackeray went to Ayodhya and visited Lord Rama. Chandrakant Patil has criticized Thackeray’s visit. The Rashtriya Swayamsevak Sangh has introduced the cultural concept of Hindu Rashtra 95 years ago. Our cultural nationalism was already acceptable to Uddhav Thackeray. Chandrakant Patil said that now it is a joy if Congress has agreed with it.

 

Web News Title: Story BJP State President Chandrakant Patil attacks Chief Minister Uddhav Thackeray over Ayodhya visit.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x