3 May 2024 12:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | अशी संधी सोडू नका! IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
x

महाराष्ट्रनामा न्यूजचं वृत्त खरं ठरलं; नवख्या प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी

Shivsena party, Rajya Sabha candidature to Priyanka Chaturvedi

मुंबई, १२ मार्च: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा हात सोडून शिवबंधन बांधणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेतल्या ५५ जागांसाठी मार्च अखेरीस मतदान होत आहे. यात राज्यातल्या ७ जागांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेत चुरस पाहायला मिळत होती. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी संसदेत पाऊल ठेवण्यास इच्छुक होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेतील जुनेजाणते नेतेही शर्यतीत असले तरी शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी या नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याचं वृत्त महाराष्ट्रनामा न्यूज’ने काही दिवसांपूर्वी दिलं होतं.

त्यादृष्टीने चतुर्वेदींनी प्रयत्न सुरु केल्याचीही माहिती होती. विशेष म्हणजे प्रियंका चतुर्वेदी या पर्यावरण-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. चतुर्वेदींनी थेट आदित्य ठाकरे यांच्यामार्फत ‘फील्डिंग’ लावल्याने राज्यसभेच्या एका जागेच्या शर्यतीत त्या सर्वात पुढे होत्या.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या ‘आदित्य संवाद’ या इव्हेंटमध्ये प्रियांका चतुर्वेदी यांची प्रमुख भूमिका होती आणि त्या सतत आदित्य ठाकरे यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळालं होतं . नुकतीच आदित्य ठाकरे यांनी दिल्लीतील फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या कार्यालयांना भेट दिली होती आणि त्यावेळी देखील प्रियांका चतुर्वेदी उपस्थित होत्या. दिल्लीत पक्षाची इमेज बिल्डिंग करण्याच्या दृष्टीने पारंपरिक उमेदवारांना बगल देत, हिंदी, इंग्लिश अशा भाषांवर प्रभूत्व असणाऱ्या आणि सर्वच पक्षांना परिचित असणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी यांच्यासाठी स्वतः आदित्य ठाकरे पुढाकार घेण्याची शक्यता होती.

आदित्य ठाकरे सध्या पर्यावरण या विषयांवरून निरनिराळ्या देशांच्या राजदूतांच्या भेटी घेत असून त्यात देखील प्रियांका चतुर्वेदी महत्वाची भुमीका बजावत आहेत. अप्पर मिडल क्लासमध्ये शिवसेनेबद्दल काहीशी नाकाराम्तक विचारधारणा आहे आणि ती देखील बदलण्याचा आदित्य ठाकरे यांचा प्रयत्न दिसतो. त्यासाठी आवश्यक असणारे चेहरे समोर आणणे आणि राज्यसभेत पक्षाची निरनिराळया विषयावरून वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा आदित्य ठाकरे यांचा निश्चय दिसतो आणि त्यामुळे त्यांचा एकूण दिनक्रम पाहिल्यास ‘इमेज बिल्डिंग’ त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं दिसतं.

अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांपेक्षा जुन्या जाणत्या नेत्यांनाच संधी मिळाली पाहिजे असाही पक्षात मतप्रवाह आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते यांची नावेही चर्चेत होती. याशिवाय विधानपरिषदेचे आमदार दिवाकर रावतेही उत्सुक असल्याची चर्चा होती. मात्र आदित्य ठाकरे प्रियांका चतुर्वेदी यांच्यासाठी आग्रही असल्याचं वृत्त आमच्या प्रतिनिधीने आधीच दिलं होतं, ज्याला आज अधिकुत दुजोरा मिळाला आहे.

महाराष्ट्रातील सात राज्यसभा सदस्यांची मुदत पुढील महिन्यात संपत असून, त्या जागांसाठी २६ मार्चला मतदान होईल. बदललेल्या राजकीय समीकरणामुळे या निवडणुकांकडे साऱ्यांचे लक्ष आहे. महाराष्ट्राच्या २८८ जणांंच्या विधानसभेत भाजपचे १०५, शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ व काँग्रेसचे ४४ सदस्य आहेत. ही संख्या २५९ होते. या निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या मताला सर्वाधिक महत्त्व असल्याने पहिल्या पसंतीचे मत आपल्याला मिळावे, यासाठी राजकीय समीकरण निश्चित केले जात आहे.

 

News English Summery: An election program has been announced for the seven seats of the Rajya Sabha in the state. Shiv Sena, the leading party in the alliance for development, has also announced its candidate after the NCP announced its candidate. Shiv Sena has nominated Priyanka Chaturvedi, the national spokesperson of the party. Priyanka Chaturvedi had joined the Shiv Sena in April 2019, leaving the Congress. He has been appointed as the deputy leader of the Shiv Sena. Priyanka Chaturvedi seems to have been nominated by the Shiv Sena-interested veterans.

 

Web News Title: Story Shivsena party gives Rajya Sabha candidature to Priyanka Chaturvedi.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x