7 May 2025 12:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

देशभरात मागील २४ तासांत ४ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद

Corona Virus, Covid 19, India

नवी दिल्ली, ११ मे: कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिका, इटलीसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही ४१ लाखांवर गेली आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.

देशात कोरोना रूग्णांची संख्या ६७ हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत ४ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर १०० रुग्ण मरण पावले आहेत. ताज्या माहितीनुसार, देशभरात एकूण रुग्णांची संख्या ६७ हजार १५२ इतकी झाली आहे. यांपैकी एकूण २ हजार २०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर २० हजार ९१७ रुग्ण बरे झाले आहेत. देशभरातील सक्रिय प्रकरणांची संख्या ४४ हजार २९ इतकी आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ३० एप्रिल रोजी देशातील सर्व जिल्ह्यांची एक लिस्ट केली होती. यात १३० जिल्हे रेड, २८४ ऑरेंज आणि ३१९ जिल्हे ग्रीन झोन करण्यात आले आहेत. मात्र गेल्या आठवड्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्याने सरकारची चिंता आता आणखीच वाढली आहे. कारण ग्रीन झोनमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्यान ते रेड झोन होऊ शकतात अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसत आहे. राज्यात आतापर्यंत २२ हजार १७१ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यांपैकी ८३२ रुग्ण मरण पावले आहेत, तर ४,१९९ रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत ८ हजार १९४ लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर एकूम ४९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडू तिसर्‍या क्रमांकावर आला आहे.

 

News English Summary: The number of corona patients in the country has crossed 67,000. More than 4,000 patients have been registered in the last 24 hours. So 100 patients have died. According to the latest information, the total number of patients across the country has reached 67,152.

News English Title: Story covid 19 new cases reached to 67152 in India within last 24 hours News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या